नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा सट्टा बाजार बंद; जाणून घ्या कारण

एक्झिट पोलनुसार NDAला सत्ता मिळणार आहे. पण, सट्टा बाजारात मात्र वेगळाच अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 02:04 PM IST

नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा सट्टा बाजार बंद; जाणून घ्या कारण

मुंबई, अक्षय कुडकेलवार, 21 मे : मुंबईतील सट्टा बाजार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपमुळे बंद पडला आहे. सट्टा बाजारात पहिल्यांदाच अशी घटना घडत आहे. नरेंद्र मोदींमुळे सट्टा बाजार बंद झाला यावर तुमचा विश्वास नाही ना बसत? पण, हे खरं आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एक्झिट पोलनंतर सर्वजण भाजप आणि नरेंद्र मोदींवर सट्टा लावत आहेत. विरोधकांवर कुणीही सट्टा लावत नसल्यानं सट्टाडो सट्टा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अखेर सट्टा बाजार बंद पडला आहे. पण, पर्सनल बेटींग मात्र सुरू आहे. मुंबईत 1 हजार कोटींचा सट्टा निवडणुकीच्या काळात लागेल असा अंदाज होता. पण, एक्झिट पोलनंतर मात्र सारं चित्र पालटलं आहे. एक्झिट पोलनं भाजप, NDAला सत्ता मिळणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानं पुन्हा एकदा मोदी असंच चित्र सट्टा बाजारात देखील पाहायाला मिळत आहे. पण, त्यानंतर देखील सर्वांच्या नजरा या 23 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.


नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? काय म्हणतोय सट्टाबाजार

काय आहे देशातल्या सट्टा बाजाराचा अंदाज

एक्झिट पोलनुसार NDAला सत्ता मिळणार आहे. पण, सट्टा बाजारात मात्र वेगळाच अंदाज आहे. शिवाय NDAला मिळणाऱ्या जागांमध्ये देखील फरक आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण, सट्टा बाजारात मात्र वेगळंच चित्र पाहायाला मिळत आहे. मुंबई वगळता सट्टा बाजारात उर्वरित ठिकाणी एक्झिट पोलच्या तुलनेत एनडीएला कमी जागा देत आहे. सट्टा बाजारानुसार भाजपला 238 ते 245 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानचा सट्टाबाजार भाजपला 242 ते 245 जागा देताना दिसत आहे. मुंबईतील सट्टा बाजार NDA सोबत आहे. दिल्लीच्या सट्टा बाजारानुसार भाजपला 238 ते 241 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबईतील सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार एनडीए सहजपणे 300चा आकडा गाठेल असा अंदाज आहे.

Loading...


'तू दलित आहेस आमचं बिघडवू शकत नाही'; गँगरेपपूर्वी पीडितेला नराधकांनी धमकावलं

भाजपला बहुमत मिळणार?

भाजपला बहुमत मिळणार की नाही? यावर देखील आता सट्टा बाजारामध्ये पैसा लावला जात आहे. मुंबईतील सट्टा बाजारानुसार काँग्रेस आणि मित्रपक्षांना 150 जागा मिळतील. अनेक एक्झिट पोलनं भाजपला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. पण, सट्टा बाजार मात्र भाजपला एतहाती सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवत नाही. सट्टाबाजारात NDAच्या पराभवावर देखील पैसे लागले आहेत. पण, ही आकडेवारी कमी आहे. 2014मध्ये भाजपच्या विजयामुळे सट्टाबाजाराला मोठं नुकसान देखील सहन करावं लागलं होतं. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार गुजरातमध्ये भाजपला 33, उत्तर प्रदेशमध्ये 42, महाराष्ट्रात 33, मध्य प्रदेशमध्ये 22 आणि राजस्थानमध्ये 21 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. सध्याची आकडेवारी पाहता सट्टा बाजार आणि एक्झिट पोलमध्ये काही प्रमणात का असेना तफावत दिसून येत आहे.


VIDEO: 'वंचित फॅक्टर'मुळे मतं फुटणार, काँग्रेसनं केलं मान्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...