JNU मधील राड्याचे मुंबई-पुण्यात पडसाद, गेटवे ऑफ इंडिया आणि FTII बाहेर विद्यार्थ्यांची निदर्शनं

JNU मधील राड्याचे मुंबई-पुण्यात पडसाद, गेटवे ऑफ इंडिया आणि FTII बाहेर विद्यार्थ्यांची निदर्शनं

'जेएनयू'तील हिंसाचारात 26 विद्यार्थी जखमी, चार संशयित दिल्ली पोलिसांचा ताब्यात

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी: राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री पुन्हा एकदा तुफान राडा झाला. त्याचे पडसाद पुण्यासह मुंबईतही पाहायला मिळाले. विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत. मुंबईतही विविध विद्यार्थी संघटानांनी जेएनयूमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर आणि पवईमध्ये विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून JNUमध्ये फी वाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच CAA आणि NRC विरोधात आंदोलन पेटल्याने वातावरण तापलेलं होतं. अशी परिस्थिती असताना रविवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. डाव्या संघटनांनी अभाविपवर(ABVP) आरोप केलेत तर अभाविपने(ABVP) डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केला आहे. दोन्ही संघटनांनी आपले विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप केलाय. परिस्थिती तणावाची झाल्यानं प्रशासनाने दिल्ली पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात पाचारण केलं. पोलिसांनी परिसरात फ्लॅग मार्च करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तोंड झाकून आलेले ते गुंड कोण होते हे शोधण्याचं आवाहन आता पोलिसां पुढे आहे. सध्या जेएनयू (JNU)विद्यापीठाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'जेएनयूमध्ये घुसून काही कार्यकर्त्यांनी तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांना जबरी मारहाण केली. ही घटना संतापजनक आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध.या घटनेची चौकशी होऊन हल्लेखोरावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.' अशी खासदार सुप्रीया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

जेएनयूमध्ये रविवारी रात्री नेमकं काय घडलं?

CAA आणि NRC विरोधात आंदोलन पेटल्याने वातावरण तापलेलं होतं. अशी परिस्थिती असताना आज रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या दोन गटात भांडण सुरू असताना तरुणांचा एक गट हा तोंडाला रुमाल बांधून या वादात उतरला आणि त्यांनी हातात रॉड घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यात अनेक जण जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यानंतर JNUमधले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात विद्यार्थी हातात रॉड आणि लोखंडी सळ्या घेऊन फिरताना दिसत आहेत. तब्बल 30 मिनिटं हा धुडगूस सुरू होता. पोलीस आल्यानंतरच परिस्थिती शांत झाली.

दरम्यान विविध मान्यवरांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तर घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना दिलेत. रात्री उशीरा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एम्समध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

First Published: Jan 6, 2020 07:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading