मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 'या' राज्यात होणार दारुची होम डिलिव्हरी

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 'या' राज्यात होणार दारुची होम डिलिव्हरी

गेल्या अनेक दिवसांपासून या निर्णयावर चर्चा सुरू होती. अनेकांनी दारुची दुकाने बंद राहण्यावर पसंती दर्शवली होती. मद्यपी मात्र यामुळे नाराज होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या निर्णयावर चर्चा सुरू होती. अनेकांनी दारुची दुकाने बंद राहण्यावर पसंती दर्शवली होती. मद्यपी मात्र यामुळे नाराज होते.

गेल्या अनेक दिवसांपासून या निर्णयावर चर्चा सुरू होती. अनेकांनी दारुची दुकाने बंद राहण्यावर पसंती दर्शवली होती. मद्यपी मात्र यामुळे नाराज होते.

  • Published by:  Meenal Gangurde
रायपूर, 3 मे : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) संकटापासून वाचण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये ग्रीन झोनमध्ये बऱ्याअंशी सूट देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुण्यात दारुची दुकाने (Wine shops) काही नियमावलींचे पालन करीत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात छत्तीसगडमधून एक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने खुली करण्याची आणि होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचा अवलंब केल्यानंतरच दारुची दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत 4 मेपासून दारुची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कलेक्टरांना यासंदर्भातील पत्र जारी करण्यात आले आहे. विशेषतत्वाने  दारुच्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्य सरकारने सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करण्यासाठी दारुची होम डिलिव्हरी करण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. होम डिलिव्हरीची रक्कम डिलिव्हरी बॉयनियुक्त करणाऱ्या प्लेसमेंट एजन्सीद्वारा ठरविण्यात येईल. याबाबतचा नेमका निधी अद्याप ठरविण्यात आलेला नाही. राज्य सरकारद्वारा जारी केलेल्या आदेशानुसार सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दारुची दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बार सुरू होणार नाहीत दारुच्या विक्रीसंदर्भात जारी केलेल्या दिशा-निर्देशांनुसार देशी वा विदेशी दारुच्या 2 बाटल्या आणि बिअरच्या 4 बाटल्या एकावेळेस खरेदी करता येऊ शकणार आहे. दुकानांमध्ये यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. राज्य सरकारद्वारे जारी केलेल्या दिशा-निर्देशांनुसार दारुची दुकाने खुली होतील मात्र बार रेस्टॉरंट आणि क्लब 4 मे ते 17 मेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित -पगार मिळाला नाही म्हणून डिप्रेशनमध्ये 22 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
First published:

पुढील बातम्या