नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी माओवाद्यांची शस्त्र खरेदी, पोलिसांनी जाहीर केले पुरावे

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी माओवाद्यांची शस्त्र खरेदी, पोलिसांनी जाहीर केले पुरावे

देशाविरूद्ध युद्ध पुकारणं, शस्त्रांस्त्रांची खेरदी करणं आणि मोदी राज संपवण्यासाठी त्या शस्त्रांचा वापर करणं अशी धक्कादायक माहिती त्या पत्रांमध्ये आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 31 ऑगस्ट :

ज्या पाच माओवाद्यी समर्थकांना पुणे पोलिसांनी अटक केली होती त्यांचे आणि बंदी असलेल्या भाकपा (माओवादी ) संघटनांच्या थेट संबंधांचे पुरावे आज पोलिसांनी मुंबईत सादर केले. अतिरिक्त पोलीस महासंचालक,कायदा आणि सुव्यवस्था पीबी सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन माओवादी समर्थक आणि माओवाद्यांची सर्वोच्च समिती असलेल्या सेंट्रल कमेटी सदस्यांमधला थेट पत्रव्यवहारच पत्रकार परिषदेत सादर केला. या पत्रांमध्ये अत्यंत खळबळजनक माहिती असून देशाविरूद्ध युद्ध पुकारणं, शस्त्रांस्त्रांची खेरदी करणं, मोदी राज संपवण्यासाठी त्या शस्त्रांचा वापर करणं, राजीव गांधींची हत्या झाली त्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती करणं असा माओवाद्यांचा डाव होता असे अत्यंत खळबळजनक पुरावेच पोलिसांनी सादर केले. असा आक्षेपार्ह मजकूर असलेली हजारो पत्र पोलिसांच्या हाती लागली असून त्यातली मोजकीच पत्र आम्ही जाहीर करत आहोत अशी माहितीही सिंग यांनी दिली.

दोन महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांनी हे पुरावे जमा केले त्यासाठी देशभरातल्या 9 ठिकाणांवर छापे टाकले आणि हे साहित्य जमा केलं आणि त्यानंतरच पाच जणांची अटक केली अशी माहितीही सिंग यांनी दिली. विद्रोही कवी वरवर राव, सुधा भारव्दाज, रोना विल्सन, अरूण परेरा आणि गौतम नवलखा यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्या सर्वांना त्यांच्याच घरांमध्य नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्या सर्वांविरूद्ध भक्कम पुरावे असल्यानं त्या सर्वांचा पोलीस कोठडी मागणार असल्याचंही सिंग यांनी सांगितलं.

काय आहे पत्रांमध्ये?

रोना विल्सन यांनी सेंट्र्ल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं पत्र

शहरी भागातल्या लोकांना जंगलात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जास्तित जास्त असंतोष निर्माण झाला पाहिजे. मोदी राज संपवण्यासाठी युद्ध पुकारलं पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या खेरदीसाठी 8 कोटी रूपयांची जमवाजम झाली आहे. शस्त्र खरेदीचे पूर्ण अधिकार वरवर राव यांना दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर हँड ग्रेनेड आणि चार लाख गोळ्यांची खेरदी होणार असून नेपाळ आणि मणिपूरमधल्या पुरवठादारांशी संपर्क साधण्यात आलाय. राजीव गांधींची हत्या ज्या प्रकारे झाली तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली पाहिजे.

सुधा भारव्दाज यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं पत्र

काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांशी संपर्कात आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. शहरात संशोदन करणारे फेलो, बुद्धिवादी नेते यांना आपली विचारसरणी पटवून देऊन त्यांना गडचिरोली आणि इतर ठिकाणी आणलं पाहिजे.

गौतम नवलखा यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड सुदर्शन यांना लिहिलेलं पत्र

लोकांवर अत्याचार होत आहेत. त्या विरूद्ध पेटून उठलं पाहिजे. एल्गार परिषदेसारखे कार्यक्रम घेऊन त्यातून जास्तित जास्त असंतोष कसा भडकेल याची काळजी घेऊ. एखाद्या दलित तरूणाचा मृत्यू झाल्यास त्याचं खूप भांडवलं केलं पाहिजे. म्हणजे असंतोष वाढेल.

रोना विल्सन यांनी सेंट्रल कमेटीचे सदस्य कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेलं आणखी एक पत्र

2013 पासून मोठी कारवाई झालेली नाही. कुठली शस्त्रास्त्र खरेदी करायची आहेत याचे फोटोही विल्सन यांनी प्रकाश यांना पाठवले होते. यात रशिया आणि चीनमधल्या मशिनगन्सचे फोटो असून ते विल्सन यांच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी डी कोड करून हस्तगत केले आहेत.

वरवर राव यांनी नागपूरचे वकिल सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं पत्र

नोटबंदीमुळे जंगलातल्या लोकांना पैशाची अडचण भासत आहे. तुमच्याकडे पैसे पाठवले होते मात्र त्याच वितरण अजून झालं नाही अशी माहिती आहे. नेमकं काय झालं तेही कळत नाही. पैसे नसल्यानं कारवाया थंडावल्या आहेत.

वरवर राव यांच्या या पत्राला सुरेंद्र गडलिंग यांनी दिलेलं पत्र

नोटबंदीमुळं तपासणी जोरात सुरू होती. त्यामुळं गडचिरोलीत पैसे पाठवायला उशीर झाला. दुसरं काहीही कारण नाही. तुम्ही दिलेले पैसै आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. आणि त्या पैशांचा पुरवढा सुरू केला आहे. आणि काही रक्कम पोहोचलीही आहे.

सेंट्रल कमेटीचे सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांनी महाराष्ट्र विभागाच्या कमेटीला लिहिलेलं पत्र

जेएनयु आणि इतर भागातून मुलं जंगलात पाठवली पाहिजे. सरकारविरूद्ध युद्ध पुकारलं पाहिजे. बऱ्याच दिवसांमध्ये मोठी कारवाई झाली नाही. जास्तित जास्त असंतोष भडकला पाहिजे. म्हणजे सरकारविरूद्ध असंतोष निर्माण होईल.

VIDEO : सुप्रिया सुळेंची 'सेल्फी विथ खड्डे' ही मोहीम पुन्हा सुरू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 03:49 PM IST

ताज्या बातम्या