मराठी बातम्या /बातम्या /देश /

पदभार स्वीकारताच दानवे अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'लोकल'बद्दल ठाकरे सरकारवर साधला निशाणा

पदभार स्वीकारताच दानवे अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'लोकल'बद्दल ठाकरे सरकारवर साधला निशाणा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांच्या पदभार रेल्वे भवनात आज स्वीकारला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांच्या पदभार रेल्वे भवनात आज स्वीकारला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांच्या पदभार रेल्वे भवनात आज स्वीकारला.

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 08 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet reshuffle) झाल्यानंतर आज सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी रेल्वे राज्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला असून ठाकरे सरकारवर (MVA Government) पहिला निशाणा साधला आहे. 'मुंबईतील लोकल सुरू करण्याचा अधिकार राज्याकडे असून  त्यांनी पत्र लिहिले तर लगेच सुरू करू शकतो' असा खुलासा दानवे यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी आज आपल्या रेल्वे राज्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना दानवे यांनी मुंबई लोकलबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.

'माझ्यामुळे देशाची बदनामी झाली', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं मागितली माफी! VIDEO

कोरोनामुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सेवा सुरू आहे. राज्याला कोरोनाची परिस्थिती माहिती आहे. जर लोकल सेवा सुरू करायची असेल तर त्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहे, त्यांनी जर आमच्याकडे पत्रव्यवहार करून विनंती केली तर लगेच लोकल सेवा सुरू करू शकतो, असं दानवे यांनी सांगितलं.

तसंच, 'लोकल सेवा कधी सुरू करावी याबद्दल राज्य सरकारने केंद्राकडे माहिती द्यावी, असंही दानवे म्हणाले.

सक्सेस साजरं करण्यासाठी गायकानं लढवली शक्कल; 23 हजार हिऱ्यांचं केलं लॉकेट

मुंबईतील लोकल सेवा कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. जोपर्यंत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन राज्य सरकारने ठरवून दिलेल्या लेव्हलमध्ये येत नाही, तोपर्यंत लोकल सेवा सुरू करणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्याकडे असल्याचे सांगून दानवे यांनी ठाकरे सरकारच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे.

First published:

Tags: Raosaheb Danve