विजयवाडा इथे रेल्वेच्या 3 तोतया अधिकाऱ्यांना अटक

लोकसभा निवडणुकीआधी भारतीय रेल्वेनं गेल्या आठवड्यात 2.50 लाख रिक्त जागा भरल्या जातील, अशी घोषणा केली. या घोषणेचा फायदा मुंबईतल्या एका टोळीनं घेतला. आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडा इथल्या बेरोजगार तरुणांना फसवण्याचा प्लॅन आखला.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 06:06 PM IST

विजयवाडा इथे रेल्वेच्या 3 तोतया अधिकाऱ्यांना अटक

मुंबई, 30 जानेवारी : लोकसभा निवडणुकीआधी भारतीय रेल्वेनं गेल्या आठवड्यात 2.50 लाख रिक्त जागा भरल्या जातील, अशी घोषणा केली. रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले, '2.25-2.50 लाख लोकांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यात. 1.50 लाख जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. '

या घोषणेचा फायदा मुंबईतल्या एका टोळीनं घेतला. आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडा इथल्या बेरोजगार तरुणांना फसवण्याचा प्लॅन आखला. ही टोळी विजयवाडा इथे आली. त्यांनी एका स्टार हाॅटेलमध्ये रूम घेतली आणि तिथे बनावट मुलाखती घेणं सुरू केलं.  त्यासाठी त्यांनी विजयवाडा इथे मुलाखतीची खोटी पत्रकंही वाटली. जणू ते खरे अधिकारी आहेत, अशी बतावणी करून त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं सुरू केल्या.

या तोतया अधिकाऱ्यांनी सगळ्या उमेदवारांना नापास केलं. मग काही उमेदवारांनी या खोट्या अधिकाऱ्यांना भेटून नोकरीसाठी पैशाची बोलणी सुरू केली. रेल्वे नोकरीसाठी या उमेदवारांकडून 10 लाख रुपये मागितले. शिवाय या टोळीनं उमेदवारांना रेल्वेच्या नोकरीत महिन्याला 30 हजार पगारही नक्की केला.

चिरंजीवी या एका उमेदवाराला काही शंका आली. कारण रेल्वे अधिकाऱ्यांनी मुलाखती घेणार नाहीत, असं सांगितलं होतं. म्हणून त्यानं विजयवाडा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी हाॅटेलवर छापा टाकला. मित्रा, नागुर आणि वरुण यशवंत या तीन तोतया रेल्वे अधिकाऱ्यांना पकडलं. हे तिघंही मुंबईहून आले होते आणि विजयवाडा इथल्या बेरोजगार तरुणांना फसवत होते.

पोलिसांनी तरुणांना अशा तोतया अधिकाऱ्यांपासून आणि खोट्या मुलाखतीच्या जाहिरातींपासून सावध राहायला सांगितलंय.

Loading...


VIDEO : चक्क मुंबईच्या 'ताज'मध्ये चोरी; बोलता बोलता पळवले 46 हजार रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...