मराठी बातम्या /बातम्या /देश /मुंबई- दिल्ली पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमधला आरोपी अटकेत, मेरठमध्ये बोगस डॉक्टर म्हणून करत होता रुग्णांवर उपचार

मुंबई- दिल्ली पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमधला आरोपी अटकेत, मेरठमध्ये बोगस डॉक्टर म्हणून करत होता रुग्णांवर उपचार

Crime News: मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) पोलिसांच्या रडारवर असलेला मोस्ट वॉन्टेडला (Crime) अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News: मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) पोलिसांच्या रडारवर असलेला मोस्ट वॉन्टेडला (Crime) अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News: मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) पोलिसांच्या रडारवर असलेला मोस्ट वॉन्टेडला (Crime) अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

मेरठ, 10 जुलै: मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) पोलिसांच्या रडारवर असलेला मोस्ट वॉन्टेडला (Crime) अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मनीष कौल गेल्या दोन वर्षांपासून मेरठमध्ये (meerut) बोगस डॉक्टर म्हणून राहत होता. बोगस डॉक्टर विक्रांत या नावानं मनीष कौल रुग्णांचे उपचार करत होता. ज्याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी शुभकामना हॉस्पिटलमधून अटक केली आहे.

दिल्लीच्या प्रसिद्ध महिला डॉक्टरशी लग्न करून त्याने 70 लाखांची फसवणूक देखील केली आहे. तसंच दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांवर गोळीबार करून तो फरार झाला होता. शुक्रवारी दिल्ली द्वारका क्राइम ब्रांचचे एसीपी गिरीश कौशिक यांच्या टीमनं डॉ. विक्रांत भगत उर्फ ​​मनीष कौल याला शुभकामना हॉस्पिटलमधून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांतचे खरे नाव मनीष कौल आहे, जो आपली ओळख लपवण्यासाठी प्रत्येक शहरात नाव बदलून राहत होता. त्याच्याविरूद्ध दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि हरियाणामध्ये जवळपास 35 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा- चालत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट, पोलिसांनी पाठवलेलं चलान बघून घाबरला मालक

दिल्लीतील मोतीनगर पोलीस ठाण्यातुन फसवणूकीच्या प्रकरणात कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आला आहे. तसंच आरोपीवर जेलमधून पळून जाण्याचा गुन्हा देखील दाखल आहे. सध्या आरोपी मनीषला दिल्ली पोलीस घेऊन गेले आहेत.

हेही वाचा- OMG! मोदींच्या 24 मंत्र्यांविरोधात हत्येचा गुन्हा, 90% मंत्री आहेत कोट्यधीश

दिल्लीत मनीष कौल याच्यावर मोतीनगर पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर पत्नीने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर 2018 मध्ये कीर्तिनगर पोलीस ठाण्यात बंदुकीनं हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मनीष कौलला पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी मनीष कौल याच्यावर बनावट एमडी पदवी मिळवल्याबद्दल मुंबईत खटला सुरु होता.

First published:

Tags: Crime, Crime news, Delhi, Mumbai