मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबई ते दिल्ली फक्त 12 तासांत, Express way चं काम सुसाट! 2 वर्षं आधीच होणार खुला

मुंबई ते दिल्ली फक्त 12 तासांत, Express way चं काम सुसाट! 2 वर्षं आधीच होणार खुला

मोदी सरकारच्या (Modi government) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं (Mumbai Delhi Express way) सध्या जोरात काम सुरू आहे. लवकरच तो खुला होईल. कसा असेल हा  (Express way) महामार्ग?

मोदी सरकारच्या (Modi government) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं (Mumbai Delhi Express way) सध्या जोरात काम सुरू आहे. लवकरच तो खुला होईल. कसा असेल हा (Express way) महामार्ग?

मोदी सरकारच्या (Modi government) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं (Mumbai Delhi Express way) सध्या जोरात काम सुरू आहे. लवकरच तो खुला होईल. कसा असेल हा (Express way) महामार्ग?

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : भाजप सरकार (Modi government ambitious project)सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम कशावर लक्ष दिलं असेल तर आहे दळणवळणासाठी रस्ते उभे करण्यावर. यामुळे भाजप सरकारच्या मागील सहा वर्षाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात हायवेची कामं सुरू असून महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली- मुंबई महामार्गाबाबत (mumbai delhi express way) महत्त्वाची बातमी आहे. या प्रकल्पाचे सध्या जोरात काम सुरु असून लवकरच हा महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

हा महतत्त्वाकांक्षी महामार्ग 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र आता सरकारने यावर जास्त लक्ष दिलं असून दोन वर्ष आधीच म्हणजेच 2022 मध्येच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची सरकारची योजना आहे.

सध्या मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी 20 ते 24 तास लागतात. मात्र या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून यामध्ये प्रवासाचे जवळपास 8 तास वाचणार आहेत. 1200 किलोमीटरचा हा सध्याचा महामार्ग असून लवकरच नागरिकांना मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी आता केवळ 12 तास खर्च करावे लागणार आहेत. 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहेत. त्याआधी 2022 मध्ये हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari dream project) यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ते या रस्त्याच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असून हा महामार्ग चालू झाल्याने संपूर्ण देशाला याचा आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.

8 लेनचा महामार्ग

यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले होते की, या महामार्गासंबंधी सर्व कामं पूर्ण झाली असून जमिनीचे संपादन देखील पूर्ण झाले आहे. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महामार्ग बांधण्यासाठी जवळपास 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  हा महामार्ग झाल्यानंतर देशातील प्रवाशांबरोबरच शेतकऱ्यांना देखील त्यांचा शेतीमाल आणि उद्योजकांना त्यांचे उत्पादन सर्व राज्यात पोहोचवण्यास मदत होणार आहे. या महामार्गावर 8 लेन असणार असून यासाठी जवळपास 82,514 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

त्याचबरोबर महामार्गाच्या दोन्ही बाजूला 50 किलोमीटरच्या अंतरावर 75 विश्रांती रस्त्यांची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्याच्या कामाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही सध्या दररोज 30 किलोमीटर रस्ता तयार करत आहोत. त्याचबरोबर आम्ही याआधी KMP, KGP आणि आणखी काही महामार्गांचे काम पूर्ण केले आहे. द्वारका महामार्ग, दिल्लीमधील रिंग रोड आणि सदर्न पेरिफेरल रोड यांचे काम सुरू असून लवकरच ते देखील पूर्ण होतील.

First published: