बिल्किस बानू सामूहिक बलात्कार प्रकरणात 11जणांची जन्मठेप कायम

2002 बिल्किस बानू सामूहिक बलात्कार प्रकरणात ११ जणांना ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली.

Sonali Deshpande | Updated On: May 4, 2017 11:58 AM IST

बिल्किस बानू सामूहिक बलात्कार प्रकरणात 11जणांची जन्मठेप कायम

विवेक कुलकर्णी, 04 मे :  2002 बिल्किस बानू सामूहिक बलात्कार प्रकरणात ११ जणांना ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टानं कायम ठेवली.  शिवाय ज्यांना सेशन्स कोर्टाने सोडलं होत, त्या ५ जणांना हाय कोर्टानं दोषी ठरवलंय.

२००२ साली गोध्रा प्रकरणानंतर उसळलेल्या दंगलीत बिल्किस बानूवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याप्रकरणी २००८ साली ट्रायल कोर्टाने ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सीबीआयनं देखील या प्रकरणी हायकोर्टात धाव घेऊन यातील तीन जणांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हा सामूहिक हत्याकांडाचा प्रकार असून तीन वर्षांच्या एका बालकासह एकाच कुटुंबातील १४ जणांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे यांतील तिघांना फाशी हवी अशी भूमिका सीबीआयनं मांडली आहे.

या प्रकरणात जयवंत नाय, गोविंद नाय, शैलेश भट्ट, राधेश्याम शाह, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहानिया, प्रदीप मोरढीया, बाकाभाई वोहानिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट, रमेश चंदना यांच्यावर सामूहिक बलात्कार, हत्या यांसह इतर अनेक आरोप आहेत.

२००२ साली अहमदाबादपासून सुमारे २५० किलोमीटरवर असलेल्या रंधीकपूर या गावात बिल्किस बानू आणि तिच्या कुटुंबियांवर हल्ला करण्यात आला होता. बिल्किस त्यावेळेस १९ वर्षांची होती आणि पाच महिन्यांची गरोदर असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यावेळेस तिच्या १४ कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा खटला मुंबईत पुन्हा चालवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close