रांची 8 ऑगस्ट: केरळमधल्या विमान अपघाताने शुक्रवारी सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरत असतांनाच झारखंडमधल्या रांची विमानतळावर आज मोठा अपघात टळला. Air Asiaचं i5-632 हे flight निघण्याच्या तयारीत असतांनाच विमानाला पक्षाची जोरदार धडक बसली. त्यामुळे तातडीने विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. विमानातले सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत. सर्व प्रवाशांची सोय दुसऱ्या विमानात करण्यात आली आहे.
विमान उड्डाणाच्या तयारीत असतांनाच पक्षाची धडक बसल्याने विमानाला धक्का बसला. वैमानिकाने प्रसंगावधान राखत तातडीने विमान थांबवलं. त्यामुळे मोठा अपघात टळला. सर्व प्रवाशांना घटनेची माहिती देण्यात आली त्यामुळे त्यांना नेमकं काय झालं ते कळालं. आता सर्व प्रवाशांची सोय दुसऱ्या विमानात करण्यात आली आहे.
Mumbai bound Air Asia flight (i5-632) aborted take-off at Ranchi Airport due to a bird-hit. All passengers are safe: Airport official pic.twitter.com/WmLhBBoMIj
— ANI (@ANI) August 8, 2020
दरम्यान, वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातातल्या मृतांची संख्या ही 18 झाली आहे. तर 123 जण जखमी आहेत. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. अशातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होतं आणि पावसाचा जोर वाढल्यानं धुसर दिसत होतं.
मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साठलं होतं याचवेळी विमान स्पीडने लँड झाल्यानं धावपट्टीवरून घसरून ते 35 फूट खोल खाली कोसळलं आणि दोन तुकडे झाले. धावपट्टीवरील पाण्यामुळे विमान घसरल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.