मराठी बातम्या /बातम्या /देश /

खात्यात 1 कोटी आणि 4 कंपन्यांची मालकी; I Love you लिहून मुंबईच्या व्यवसायिकानं स्वत:ला संपवलं

खात्यात 1 कोटी आणि 4 कंपन्यांची मालकी; I Love you लिहून मुंबईच्या व्यवसायिकानं स्वत:ला संपवलं

एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी पंकज इंदूरमध्ये गेला होता. पोलिसांना त्याच्याजवळ एक नोटबुक सापडली आहे.

एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी पंकज इंदूरमध्ये गेला होता. पोलिसांना त्याच्याजवळ एक नोटबुक सापडली आहे.

एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी पंकज इंदूरमध्ये गेला होता. पोलिसांना त्याच्याजवळ एक नोटबुक सापडली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 डिसेंबर : इंदूरमधील आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध बार टेंडर व इव्हेंट कंपनीचा मालक पंकज कामळे (Pankaj Kamle Sucide) यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. बार टेंडर (Bar tender) म्हणून पंकज यांचे नावही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. आत्महत्येमागचे कारण प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मुंबईत राहणारे पंकज कामळे हे चार इव्हेंट कंपनीचे मालक होते. त्यांची ओळख केवळ मुंबईतच नाही तर बाहेरची प्रसिद्ध बार टेंडर म्हणून केली जात होती. पंकज आपल्या टीमसोबत आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नाचा इव्हेंट आयोजित करण्यासाठी इंदूर येथे आले होते. ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र बुधवारी जे काही झालं त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की पंकजच्या नोटबुकमध्ये एक कोटी रुपयांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पंकज यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलचे व्यवस्थापक आणि पंकजच्या टीमने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांना खोलीत पंकजचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळावरील केलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी पंकजची नोट बुक सापडली आहे. ज्यात आय लव्ह यू नीलम असं लिहिलं आहे. नोटबुकमध्ये एका तरुणीसोबत पंकजच्या प्रेमाविषयी लिहिलं आहे. पोलिसांनी ही नोटबुक ताब्यात घेतली आहे. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

या वेळी पंकजचा भाऊ बेनी प्रसाद म्हणाला की, पंकजचं नाव त्यांच्या कामासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्याच्यासारखा बार टेंडर आतापर्यंत झालेला नाही. बेनी यांच्या म्हणण्यानुसार ही टीम रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमात काम करत होती. पंकज तिथे उपस्थित होते. पण त्याच वेळी पंकजने तब्येत बरी नसल्याचं कारण सांगत हॉटेलमध्ये निघून गेला.बेनीने सांगितलं की, सकाळी जेव्हा ते लोक हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा पंकज आपल्या खोलीत फासावर लटकलेला दिसून आला. ज्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पंकजच्या नोटबुकमध्ये नीलम नावाच्या मुलीचा उल्लेख आहे. प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणात घडल्याचे समोर येत आहे.  त्याने कुटुंबीयांना एक मेसेज पाठवला होता. मात्र पोलिसांनी त्याबाबत काहीही सांगितलं नाही.

First published:

Tags: Mumbai, Sucide