मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला पाकिस्तानी कोर्टाने ठोठावली 5 वर्षांची शिक्षा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला पाकिस्तानी कोर्टाने ठोठावली 5 वर्षांची शिक्षा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली.

  • Share this:

इस्लामाबाद, 12 फेब्रुवारी : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. हाफीज सईद हा जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. याआधीही हाफीज सईदला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती पण त्याला सोडूनही देण्यात आलं होतं. आता या शिक्षेचीही अमलबजावणी होणार का हे पाहावं लागेल. हाफीज सईदवर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचे आरोप होते. हे आरोप सिद्ध झाल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आली.

(हेही वाचा : मदरशांमध्येही हनुमान चालीसाचे पठण सुरू करा, भाजप नेत्याची मागणी)

भारताने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व झकी-उर-रहमान लखवी यांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. या सर्वांना नव्या ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ (अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अ‍ॅक्ट)अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हणून हाफीज सईद भारताला हवा आहे. त्याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावं, अशीही भारताची मागणी आहे पण हाफीज सईद पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरत असतो. त्यामुळे या शिक्षेची तरी अमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे.

===================================================================================

First published: February 12, 2020, 4:12 PM IST

ताज्या बातम्या