S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

म्हणे, बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई ते अहमदाबाद रेल्वे 40 टक्क्यांहून अधिक रिकामीच !

गेल्या 3 महिन्यात 40 टक्के तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत पुढे आलीये.

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2017 06:56 PM IST

म्हणे, बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई ते अहमदाबाद रेल्वे 40 टक्क्यांहून अधिक रिकामीच !

31 आॅक्टोबर : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च करण्यासाठी उत्सुक मोदी सरकारला धक्का देणारं वास्तव समोर आलंय.  मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यात गेल्या 3 महिन्यात 40 टक्के तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत पुढे आलीये.  या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेस 29.91 कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अशा 3 महिन्याची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनजीत सिंह यांनी अनिल गलगली यांना 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली. यात मुंबई ते अहमदाबाद अशा 30 मेल एक्स्प्रेसने 4,41,795 प्रवाशांनी प्रवास केला प्रत्यक्षात 7,35,630 सीट्स होत्या.एकूण महसूल रुपये 44,29,08,220 इतका येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुपये 30,16,24,623 इतकाच महसूल प्राप्त झाला.  14,12,83,597 इतके आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 31 मेल एक्स्प्रेसची सुविधा असून 3,98,002 प्रवाशांनी प्रवास केला असून प्रत्यक्षात 7,06,446 सीट्स होत्या. रुपये 15,78,54,489 रुपये इतके आर्थिक नुकसान सहन

करणाऱ्या पश्चिम रेल्वेस रुपये 42,53,11,471 इतका महसूल अपेक्षित होता पण फक्त रुपये 26,74,56,982/- इतका महसूल प्राप्त झाला.यात दुरोतों, शताब्दी, गुजरात मेल,भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती सारख्या गाड्यांचा समावेश आहे. अहमदाबाद मंडळ अभियंताने अनिल गलगली यांना कळवले की, अहमदाबादसाठी नवीन गाडीचा कोणताही प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला नाही. 12009 शताब्दी ज्या कार चेअरसाठी प्रसिद्ध आहे. त्यात अहमदाबाद येथे जाताना 72,696 पैकी फक्त 36117 प्रत्यक्ष प्रवासी लाभले आणि रुपये 7,20,82,948 ऐवजी फक्त रुपये 4,11,23,086 इतकीच कमाई झाली तर Executive चेअरच्या 8,216 पैकी 3,468 सीटसवर प्रवासी होते.  1,63,57,898 ऐवजी रुपये 64,14,345 कमाई झाली.

अहमदाबाद येथून मुंबईकडे परतताना 12010 या शताब्दीमध्ये 67,392 पैकी 22,982 सीट्सवर प्रवाशांनी प्रवास केला आणि रुपये 6,39,08,988 ऐवजी रुपये 2,51,41,322 इतकीच कमाई झाली. तर Executive चेअरच्या 7505 पैकी फक्त 1469 सीट्सवर प्रवासी होते ज्यांच्याकडून रेल्वेस रुपये 1,45,49,714 ऐवजी रुपये 26,41,083 महसूल प्राप्त झाला.  सर्व गाड्यांची स्थिती समान असून सर्वाधिक मागणी स्लीपर क्लाससाठी असताना त्याचा रेल्वे मंत्रालय गांभीर्याने विचार करत नाही.

अनिल गलगली यांच्या मते अहमदाबाद येथे जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी ही स्लीपर क्लास असून महाग तिकिटे असलेल्या गाड्यातील सीट्स शत प्रतिशत कधीच भरल्या जात नाही. केंद्र आणि राज्य सरकार सोबत रेल्वे मंत्रालयाने या बाबीचा अभ्यास करण्याऐवजी बुलेट ट्रेन हा निवडलेला पर्याय सर्व सामान्य जनतेसाठी सोयीस्कर नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 06:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close