Home /News /national /

शताब्दी ट्रेनमध्ये 'ब्रेड बटर' खाल्ल्याने 40 महिलांना विषबाधा

शताब्दी ट्रेनमध्ये 'ब्रेड बटर' खाल्ल्याने 40 महिलांना विषबाधा

एकामागून एक प्रवाशांना हा त्रास होत असल्याने एकच खळबळ उडाली. शेवटी गाडी सुरतला आल्यानंतर चेन ओढून ट्रेन थांबविण्यात आली.

    मुंबई 07 जानेवारी : रेल्व प्रवासात प्रवाशांना अनेकदा गाडीत मिळणाऱ्या खाद्य पदार्थांवरच अवलंबून राहावं लागतं. त्यात जर गाडी शताब्दी सारखी असेल तर मग प्रवासी निर्धास्त असतात. पण आज मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या शताब्दीच्या प्रवाशांना फटका बसला. ट्रेनमध्ये मिळणारी ब्रेड बटर खाल्ल्याने तब्बल 40 महिलांना विषबाधा झाली त्यामुळे ट्रेन थांबवावी लागली आणि प्रवाशांवर उपचार करण्यात आले. आता सर्व प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर असून काहींना डिस्चार्ज देण्यात आलाय तर काहींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेत मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या दर्जा विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. शताब्दी ट्रेन मंगळवारी मुंबईहून अहमदाबादला जात होती. सकाळी गाडीत प्रवाशांना ब्रेड बटर सकाळच्या चहा सोबत देण्यात आलं होतं. प्रवाशांनी हे ब्रेड बटर खाल्ल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागला. मळमळ, उलटी, अस्वस्थ वाटणं आणि जुलाब होणं यासारखा त्रास सुरू झाला. एकामागून एक प्रवाशांना हा त्रास होत असल्याने एकच खळबळ उडाली. शेवटी गाडी सुरतला आल्यानंतर चेन ओढून ट्रेन थांबविण्यात आली. आणि डाक्टरांना बोलावून प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यात आले. नव्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही प्रवास करणार तर तो महागात पडणार आहे. रेल्वेच्या भाड्यात 1 पैसे ते 4 पैसे प्रतिकिलोमीटरची वाढ झालीय.पॅसेंजर आणि फ्रेट अशा दोन्ही भाड्यांमध्ये बदल करण्याची ही योजना आहे पण आता फ्रेटसाठीचं भाडं आधीच जास्त असल्याने यामध्ये वाढ होणार नाही. पण पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात वाढ होईल. मोदी सरकारचा नवा नियम, तुमच्या घरातला AC चालणार 24 डिग्रीवर एसी, स्लीपर, जनरल आणि कमी अंतराच्या गाड्यांचं भाडंही वाढवलं जाणार आहे. रेल्वेभाड्यात वाढ करण्याच्या या निर्णयाला नोव्हेंबरमध्येच मंजुरी मिळाली होती. पण झारखंडच्या निवडणुकांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, अशी माहिती आहे. रेल्वेने गेली काही वर्षं भाडं वाढवलेलं नव्हतं. 4 वाजेपर्यंत आजच करून घ्या बँकेचं काम, 'हे' आहे महत्त्वाचं कारण पण आता मात्र व्यावहारिक कारणांमुळे हा निर्णय घ्यावा लागला, असं रेल्वेचं म्हणणं आहे. असं असलं तरी लोकलचं भाडं मात्र वाढणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना काळजी करण्याचं कारण नाही. इंडियन रेल्वे कॉ़न्फरन्स असोसिएशनने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून रेल्वेचं बेसिक भाडं वाढवण्यात आलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या