मराठी बातम्या /बातम्या /देश /

1980 सालातील घटना: 41 वर्षांनंतर बलात्काराच्या आरोपावर सुनावणी, महिला म्हणाली, केस बंद करा!

1980 सालातील घटना: 41 वर्षांनंतर बलात्काराच्या आरोपावर सुनावणी, महिला म्हणाली, केस बंद करा!

1980 साली मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये झालेल्या एका घटनेबाबत तब्बल 41 वर्षांनी अहमदाबादमधल्या कोर्टात सुनावणी (Rape trial after 41 years) पार पडली.

1980 साली मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये झालेल्या एका घटनेबाबत तब्बल 41 वर्षांनी अहमदाबादमधल्या कोर्टात सुनावणी (Rape trial after 41 years) पार पडली.

1980 साली मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये झालेल्या एका घटनेबाबत तब्बल 41 वर्षांनी अहमदाबादमधल्या कोर्टात सुनावणी (Rape trial after 41 years) पार पडली.

गुजरात, 17 डिसेंबर: उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासमान असतो, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. आपल्याकडील न्याय प्रक्रियेत दुर्दैवाने याची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहते. 1980 साली मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये झालेल्या एका घटनेबाबत तब्बल 41 वर्षांनी अहमदाबादमधल्या कोर्टात सुनावणी (Rape trial after 41 years) पार पडली. एका महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार (1980 rape case) त्यावेळी नोंदवली होती. 30 नोव्हेंबर 2021ला पुराव्यांअभावी या घटनेतील आरोपीची निर्दोष मुक्तता (Accused acquitted after 41 years) करण्यात आली. पुरावा न मिळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले, या महिलेने न्यायालयात येण्यास दिलेला नकार.

काय होते हे प्रकरण

30 जून 1980 रोजी मुंबईच्या एका टॅक्सी चालकासोबत अहमदाबादच्या सरखेज (Sarkhej woman rape case) परिसरातील एक महिला पळून गेली होती. यावेळी तिची एक मैत्रिणही तिच्यासोबत होती. हे तिघे मुंबईला आल्यानंतर, 3 जुलै रोजी तिची मैत्रिण अहमदाबादला परत गेली होती. या दरम्यान पोलीस तिचा शोध घेत होते. 8 जुलैला ही महिला पोलिसांना सापडली होती. यानंतर तिने या टॅक्सी चालकावर बलात्काराचा आरोप केला होता. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा- पोटच्या लेकराकडून घात, 16 वर्षाच्या मुलाकडून झोपलेल्या पालकांवर कुऱ्हाडीनं वार 

या प्रकरणाबाबत तब्बल 41 वर्षांनी, म्हणजे यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुनावणी (Hearing on rape case after 41 years) पार पडली. याबाबत महिलेला माहिती देण्यात आली असता, तिने हे प्रकरण बंद करण्याची विनंती केली. सध्या 55 वर्षे वय असलेल्या या महिलेने न्यायालयाला सांगितले, की आता तिचे लग्न झाले असून, तिची दोन मुलंही मोठी झाली आहेत. त्यामुळे आता तिला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही. ही केस आता बंद करावी (Woman requested to close case), अशी लेखी मागणी तिने न्यायालयाला केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एम. व्यास यांनी आपल्या निकालामध्ये याचा उल्लेख केला आहे.

पुरेशा पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

याप्रकरणी एकूण चार जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. यामध्ये पीडितेच्या वडिलांचाही समावेश होता. आरोपी दोन महिलांसोबत मुंबईला आला होता, हे या साक्षींमधून समोर आले. एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला आपल्या वाळकेश्वरमधील घरी आणले होते. अर्थात, तिला डांबून (woman was not confined by accused) ठेवण्यात आले नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 1980 रोजी आरोपीने एका 20 वर्षाच्या तरुणीसोबत लग्न केले होते. पण ती महिला म्हणजे पीडिताच होती का याबाबत खात्री नसल्याचे या साक्षीदाराने म्हटले.

याप्रकरणी पीडितेनेच काही बोलण्यास नकार दिल्यामुळे (woman refused to testify) बाकी साक्षीदारांची साक्ष नगण्य ठरते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, आरोपीचे 1 जुलै रोजी लग्न झाले होते, मात्र हे त्याच महिलेसोबत झाले होते की नाही याबाबत स्पष्टता नसल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले. दुसरीकडे, या महिलेचे अपहरण झाल्याचे, लग्न झाल्याचे वा अत्याचार झाल्याचेही कोणतेच पुरावे नसल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात Omicron चं थैमान, तासा-तासाला वाढताहेत रुग्ण  

याप्रकरणी नेमकं काय झालं होतं याबाबत संदिग्धता असली, तरी न्याय प्रक्रियेस लागणारा विलंब ही नक्कीच गंभीर बाब आहे. कदाचित या प्रकरणावर तेव्हाच सुनावणी पार पडली असती, तर या महिलेने आपली बाजू न्यायालयात मांडली असती. या प्रकरणात आरोपी खरोखरच निर्दोष असेल, तर त्यालाही गेली 41 वर्षे झालेला मनस्ताप टळला असता.

First published:

Tags: Gujrat, Mumbai