नवी दिल्ली, 02 मे : सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीका केली. आमच्या काळात ( UPA ) देखील अनेक सर्जिकल स्ट्राईक झाले. पण, त्याचा निवडणुकीच्या दृष्टीनं प्रचारासाठी केव्हा उपयोग करण्यात आला नाही. भाजप राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा उपयोग करत आहे ही बाब शर्मेची असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. UPAच्या काळात देखील सैन्याला दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास मुभा देण्यात आल्याचं मनमोहन सिंग यांनी 'हिंदुस्थान टाईम्स'शी बोलताना स्पष्ट केलं.
आम्ही शत्रुला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून उत्तर दिलं. पण, त्याचं केव्हा राजकारण केलं नाही असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
VIDEO VIRAL प्रियांका गांधी खऱ्याखुऱ्या विषारी सापाशी खेळतात तेव्हा...
मोदी सरकारच्या त्या निर्णयावर टीका
2016मध्ये पठाणकोट एअर बेसवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी ISIला बोलावणं ही मोदी सरकारची चूक होती असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी नागरिक महागाईनं बेहाल; जगणं महागलं
दहशतवाद्यांना प्रत्य़ुत्तर
वाढते दहशतवादी हल्ले पाहता 2016मधील पठाणकोट हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना उत्तर दिलं होतं. शिवाय, पुलवामा हल्ल्यानंतर देखील भारतानं एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर काँग्रेसनं केलेल्या कारवाईबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील सध्या यावरून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा देखील केंद्रस्थानी आहे. त्यावरून भाजप - काँग्रेसमध्ये जोरदार आरोप - प्रत्यारोप रंगल्याचं चित्र सध्या पाहायाला मिळत आहे.
SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!