मुलायमसिंह यादव यांचं निधन; पण कोण आहेत हे समाजवादी नेते? ही बातमी नीट वाचा...

मुलायमसिंह यादव यांचं निधन; पण कोण आहेत हे समाजवादी नेते? ही बातमी नीट वाचा...

ज्येष्ठ समाजवादी नेते मुलायमसिंह यादव (Mulayam singh yadav news) यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर तुम्ही वाचली असेल. पण हे वृत्त खरं आहे का? कोण आहेत हे मुलायमसिंह?

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव (Mulayam singh yadav news) यांचं 92 व्या वर्षी निधन ही बातमी गेले काही तास विविध वृत्तसंस्था देत आहेत. सोशल मीडियावरून देखील तुम्ही ती वाचली असेल. माजी आमदार आणि समाजवादी नेते (Samajwadi party) मुलायमसिंह यादव यांचं शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. पण या वृत्तातून आपल्याला परिचित असलेल्या नेत्याविषयी गैरसमज होण्याची शक्यता आहे.

हे 92 वर्षांचे समाजवादी नेते या पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नव्हेत. तर हे त्याच नावाचे दुसरे नेते आहेत. औरेया जिल्ह्यातले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शनिवारीच वृद्धापकाळाने निवर्तले. त्यांच्या निधनानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीसुद्धा दुःख व्यक्त केलं. पण मुलायम सिंह यांच्या नावसाधर्म्यामुळे चुकीची माहिती आणि गैरसमज देशभर पसरले.

उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातले हे मुलायम सिंह यादव आमदारही होते. 1949 पासून ते राजकारणात सक्रिय होते. 92 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या मुलायमसिंह यादवांचे हे दुसरे मुलायमसिंह यादव निकटचे सहकारी राहिले आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 5, 2020, 4:30 PM IST

ताज्या बातम्या