काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातूनच; चव्हाण, शिंदे नव्हे तर 'या' नेत्याचे नाव सर्वात आघाडीवर!

काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातूनच; चव्हाण, शिंदे नव्हे तर 'या' नेत्याचे नाव सर्वात आघाडीवर!

काँग्रेस पक्षाला आता मराठी नेतृत्वाशिवाय पर्याय नाही अशी चिन्हे दिसत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: काँग्रेस पक्षाला आता मराठी नेतृत्वाशिवाय पर्याय नाही अशी चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्ष नव्या अध्यक्षाचा शोध घेत आहे. पक्षाचे नेतृत्व कोण करणार याचा शोध अद्याप संपलेला नाही. अध्यक्षपदासाठी गेल्या काही महिन्यात अनेक नावे चर्चेत आलीत पण त्यातील सर्वाधिक नावे ही महाराष्ट्रातून होती. सर्व प्रथम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. आता महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याचे नाव देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे.

शनिवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील पक्षाचे नेते मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांचे नाव आघाडीवर आहे. देशातील आणि राज्यातील अन्य नेत्यांना मागे टाकत अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेत वासनिक यांनी पहिले स्थान मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शुक्रवारी अहमद पटेल, ए.के.अँटनी आणि के.सी.वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली.

वासनिक यांच्या आधी राज्यातील गांधी कुटुंबाच्या जवळ असलेले सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. पण आता मुकुल वासनिक यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. वासनिक यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. वासनिक यांना अध्यक्ष केल्यास त्याचा फायदा या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देखील होऊ शकते असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.

मुकुल वासनिक यांचे राजकीय करिअर

महाराष्ट्र काँग्रेसमधील एक सिनिअर नेते म्हणून मुकुल वासनिक यांचे नाव घेतले जाते. तीन वेळा खासदार राहिलेले बाळकृष्ण वासनिक यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून वयाच्या 28व्या वर्षी निवडणूक जिंकली होती. तर UPA सरकारमध्ये ते सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत होते. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रामटेकमधून विजय मिळवला होता. त्याआधी ते बुलढाण्यातून निवडणूक लढवत असत. 1984मध्ये त्यांनी जेव्हा प्रथम लोकसभेची निवडणूक जिंकली होती तेव्हा ते केवळ 25 वर्षाचे होते. तेव्हाच्या लोकसभेत ते सर्वात कमी वयाचे खासदार होते.

1984 ते 86 या काळात मुकुल वासनिक काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष देखील होते. 1988 ते 90 या काळात ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1984च्या लोकसभा निवडणुकीत बाळकृष्ण वासनिक यांनी मुकुल यांच्यासाठी बुलढाणा मतदारसंघ सोडला होता. 1984च्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. पण त्यानंतर 1989च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. या पराभवानंतर देखील पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

First published: August 9, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading