S M L

मोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी

निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांना बढती देण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2017 12:07 PM IST

मोदींच्या टीममध्ये नक्वींसह 4 मंत्र्यांना बढती, 9 नव्या चेहऱ्यांना संधी

03 सप्टेंबर : 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अखेर मोदी सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळाचा विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. चार मंत्र्यांना बढती देण्यात आली तर नऊ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांना बढती देण्यात आलीये.

घटकपक्षांना डावलून मोदी सरकारने आपला तिसरा मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय. शिवसेना आणि जदयूला कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आजच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती राजनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 4 केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांच्या कामाची दखल घेत कॅबिनेटपदाची बढती देण्यात आलीये.

तसंच मोदींच्या या मंत्रिमंडळात 9 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.


बिहारचे माजी मंत्री आणि बिहारचे ब्राम्हण नेता अश्विनी चौबे, उत्तर प्रदेशच्या गोरखपुरचे शिव प्रताप शुक्ला, मध्यप्रदेशातील दलित चेहरा वीरेंद्र कुमार ,कर्नाटका मधून 5 वेळा निवडून आलेले अनंत कुमार हेगडे, विदेश सेवतील निवृत्त अधिकारी आणि माजी अॅम्बेसेडर हरदीप सिंह पुरी, राजस्थानमधील जोधपुरचे खासदार गजेंद्र शेखावत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि उत्तर प्रदेशातील जाट चेहरा सत्यपाल सिंह, माजी गृह सचिव आर के सिंह, माजी सनदी अधिकारी आणि केरल मधून येणारे अल्फोंस कांनाथनाम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

नव्या चेहऱ्यांचा थोडक्यात परिचय

शिवप्रसाद शुक्ला

Loading...

- उत्तर प्रदेशमधले राज्यसभेचे खासदार

- संसदीय ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य

- ४ वेळा आमदार

- १९७०च्या दशकात विद्यार्थी राजकारणापासून सुरुवात

- अश्विनी कुमार चौबे

- बिहारमधल्या बक्सरचे लोकसभा खासदार

- बिहार विधानसभेत सलग 5 वेळा आमदार

- बिहारमध्ये आरोग्य, नगरविकास खात्याचे मंत्री होते

- जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रिय होते

वीरेंद्र कुमार

- मध्य प्रदेशच्या टिकमघरमधून लोकसभा खासदार

- सलग ६ वेळा लोकसभा खासदार

- जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय

- सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव

अनंतकुमार हेगडे

- कर्नाटकातल्या उत्तर कन्नडामधून खासदार

- 28व्या वर्षी लोकसभा खासदार

- ग्रामीण प्रश्नांचा गाढा अभ्यास

- कोरियन मार्शल आर्टमध्ये प्राविण्य

राजकुमार सिंह

- बिहारच्या आराहमधून लोकसभा खासदार

- अनेक संसदीय समितींचे सदस्य

- माजी सनदी अधिकारी

- माजी केंद्रीय गृह सचिव

- हरदीपसिंग पुरी

- १९७४ बॅचचे आयएफएस अधिकारी

- राष्ट्रीय सुरक्षा या विषयातले तज्ज्ञ

- RAIFSDC या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष  

- न्यूयार्कच्या इंटरनॅशनल पीस इन्स्टीट्यूटचे माजी अध्यक्ष

- गजेंद्र सिंह शेखावत

- जोधपूरचे लोकसभा खासदार

- संसदीय अर्थ स्थायी समितीचे सदस्य

- साध्या राहणीसाठी प्रसिद्ध

-सत्यपाल सिंग

- उत्तर प्रदेशच्या बागपतचे लोकसभा खासदार

- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त

- २०१४मध्ये पहिल्यांदा खासदार

- अल्फान्सो कांनाथनाम

- 1979च्या बॅचचे आएएस अधिकारी

- दिल्लीत 'डीमॉलिशन' मॅन म्हणून ओळख होती

- अनेक स्वयंसेवी संस्था चालवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2017 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close