S M L

गेल्या 70 वर्षांच्या काळात मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलंय - मुख्तार अब्बास नक्वी

मोदी सरकारला मुस्लिमांची मनं जिंकायला बरेच कष्ट घ्यावे लागतील, असं मत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 18, 2018 09:36 AM IST

गेल्या 70 वर्षांच्या काळात मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलंय - मुख्तार अब्बास नक्वी

मुंबई, 18 जून : गेल्या 70 वर्षांच्या काळात मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलंय. त्यामुळे मोदी सरकारला मुस्लिमांची मनं जिंकायला बरेच कष्ट घ्यावे लागतील, असं मत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने मुस्लिमांना त्यांच्यासाठी सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती द्यायला हवी. तसेच तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कशाप्रकारे प्रयत्न केले, हेदेखील मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचले पाहिजे.

एकूणच मुस्लिमांची मनं जिंकायला आम्हाला अजून बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. असं नक्वी यांनी म्हंटलंय. दरम्यान, शनिवार झालेल्या ईदला नक्वी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा...

दिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर!

गौरी लंकेश हत्या प्रकरण : मास्टर माईंडची ओळख पटली?

'डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास केव्हा लागणार'?

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यानं अनुष्काला काय दिलं प्रत्युत्तर?

'असले' जीवघेणे स्टंटस् करू नका!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close