आम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी

आम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी

‘आम्ही ‘मेक इन ओडिसा’मध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहोत. रिलायन्स जिओ व्यवसाय नसून एक मिशन आहे. इंटरनेट वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे'

  • Share this:

ओडिसा, 12 नोव्हेंबर : ‘रिलायन्स गाव आणि शहरांना जोडण्याचं काम करत आहे. त्याद्वारे आम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत,’ असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. ओडिसातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सुरू असलेल्या ‘मेक इन ओडिसा’ कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.

येत्या काळात आम्ही ओडिसामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचंही, मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं.

‘इंटरनेट वापरात भारत नंबर वन’

‘आम्ही ‘मेक इन ओडिसा’मध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहोत. रिलायन्स जिओ व्यवसाय नसून एक मिशन आहे. इंटरनेट वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे,’ असं म्हणत मुकेश अंबानी यांनी डिजिटल भारतावर भाष्य केलं.

‘जगामध्ये संगीत, सिनेमा, बँकिंग, घर, आरोग्य आणि शिक्षणासोबत सर्वच डिजिटल होत आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेबरोबरच सामान्य माणसाच्या आयुष्यावरही प्रभाव टाकत आहे,’ असं म्हणत अंबानी यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केलं.

‘ओडिसाला डिजिटल सेक्टरमध्ये पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणार’

मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, आम्ही ओडिसाला डिजिटल क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ग्रामीण ओडिसामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला डिजिटली डेव्हलप करण्यावर आमचा भर असेल, असंही मुकेश अंबानी म्हणाले.

VIDEO 'हे भगवान', 'गर्ल पॉवर' अशी व्हॉट्सअॅपची भन्नाट स्टिकर वापरायची कशी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 03:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading