मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुकेश अंबानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; चीनचा हा व्यावसायिक पहिल्या क्रमांकावर

मुकेश अंबानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; चीनचा हा व्यावसायिक पहिल्या क्रमांकावर

आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचंही नाव सामिल आहे. यावर्षी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नेटवर्थ वाढून 76.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहचलं आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 31 डिसेंबर : कोरोना काळात अनेक उद्योगपतींनी, या आपत्तीचं संधीत रुपांतर केलं. त्यामुळेच अनेक व्यावसायिकांच्या संपत्तीत जबरदस्त वाढ झाली. या यादीत झोंग शानशान याचं नाव सामिल आहे. शानशान यांच्या संपत्तीत या वर्षात मोठी वाढ झाली आहे. त्याचं नेटवर्थ या वर्षात 70.9 अब्ज डॉलरने वाढून, 77.8 अब्ज डॉलर झालं आहे. शानशान यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एवढंच नाही, तर त्यांनी चीनच्या सर्वात श्रीमंत अलीबाबाच्या जॅक मा यांनाही मागे टाकलं आहे. आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचंही नाव सामिल आहे. यावर्षी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नेटवर्थ वाढून 76.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहचलं आहे. ब्लूमबर्गच्या आकड्यांनुसार, झोंग शानशान यांच्याआधी अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. यावर्षी मुकेश अंबानी यांची संपत्ती 18 अब्ज डॉलरने वाढली आणि 76.9 अब्ज डॉलर संपत्तीसह ते आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. झोंग बॉटल बंद पाणी आणि कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या व्यवसायाशी जोडलेले आहेत. झोंग यांचा व्यवसाय पत्रकारिता, मशरूम शेती आणि आरोग्य क्षेत्रापर्यंत पसरला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या नव्या रिपोर्टनुसार, संपत्तीमध्ये सर्वात वेगवान वाढ होण्याच आतापर्यंतचा हा रेकॉर्ड आहे. त्यांना दोन कारणांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात सफलता मिळाल्याचं बोललं जात आहे. एप्रिलमध्ये त्यांनी बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मेसी एंटरप्राईज कंपनीकडून वॅक्सिन विकसित केली आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची, बाटलीबंद पाणी बनवणारी नोंगफू स्रिंग कंपनी हाँगकाँगमध्ये सर्वात लोकप्रिय ठरली. नोंगफू स्रिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 155 टक्के वाढ झाली आणि वेन्टाईने 2000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या कारणांमुळे ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्याखाली दुसऱ्या स्थानावर मुकेश अंबानी आहेत.
First published:

Tags: Mukesh ambani

पुढील बातम्या