या शतकात भारत जगातला सर्वात शक्तिशाली देश बनेल - मुकेश अंबानी

या शतकात भारत जगातला सर्वात शक्तिशाली देश बनेल - मुकेश अंबानी

' भारत जगासमोर एक सशक्त आर्थिक शक्ती म्हणून समोर येतेय. या शतकात भारत जगातला सर्वात शक्तिशाली देश बनेल,' अशी ग्वाही 'आरआयएल'चे सीएमडी मुकेश अंबानी यांनी दिली.

  • Share this:

01 डिसेंबर : ' भारत जगासमोर एक सशक्त आर्थिक शक्ती म्हणून समोर येतेय. या शतकात भारत जगातला सर्वात शक्तिशाली देश बनेल,' अशी ग्वाही  'आरआयएल'चे सीएमडी मुकेश अंबानी यांनी दिली. 'एचटी समीट 2017'मध्ये ते बोलत होते. सीएनएन न्यूज18 नेटवर्क या परिषदेचे मीडिया पार्टनर आहे.

ते पुढे म्हणाले, 'सध्या जगात चवथी औद्योगिक क्रांती सुरू आहे. आणि भारत त्याचं नेतृत्व करतोय. आणि 21व्या शतकात आपण चीनच्याही पुढे जाऊ.'

'शिक्षण, शेती आणि आरोग्य सेवांवर फोकस करून भारत प्रगतीच्या नव्या शिड्या चढणार आहे. येणाऱ्या दिवसात भारत नंबर 1 स्टार्टअप देश बनेल.' असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 03:40 PM IST

ताज्या बातम्या