नवी दिल्ली, 30 एप्रिल: देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, त्याबद्दल सुप्रीम कोर्टात सुरू असणाऱ्या सुनावणीदरम्यान मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कोविड-19 (Covid-19 fight) विरोधातल्या लढ्यात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केलेल्या तातडीच्या मदतीचं कौतुक झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने जामनगर इथल्या कारखान्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 700 MT ने वाढवली. त्यामुळे अनेक कोविड रुग्णांपर्यंत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन(LMO) वेळेत पोहोचू शकला.
"Its an eye opener for me as an administrator to see how Reliance Industries Limited Jamnagar ha produced LMO and now it has gone up by another 700 MT" Ms. Dwara before Justice Chandrachud @flameoftruth @reliancejio #SupremeCourt #SupremeCourtofIndia #JusticeChandrachud pic.twitter.com/75QfOMookx
— Bar & Bench (@barandbench) April 30, 2021
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे माहिती देताना अतिरिक्त सचिव सुमिता डावरा म्हणाल्या, "रिलायन्स इंडस्ट्रीजने जामनगरमध्ये LMO चं उत्पादन आणखी 700 MT पर्यंत वाढवलं हे अॅडमिनिस्टर म्हणून डोळे उघडणारं आहे."
मुकेश अंबानी यांच्या अधिपत्याखाली रिलायन्सच्या जामनगर इथल्या रिफायनरीमधून मेडिकल ग्रेडच्या ऑक्सिजनचं उत्पादन युद्धपातळीवर वाढवण्यात आलं. 700 मेट्रिक टनवर ते वाढवण्यात यश आलं. या वाढीव ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या कोविड रुग्णालयांना आता होतो आहे. या तीन राज्यातल्या 70 हजार गंभीर आजारी कोविड रुग्णांना दररोज यामुळे प्राणवायू मिळत आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याखेरीज रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने Reliance Foundation covid care facility in Jamnagar) मुंबईत कोरोनारुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, ICU सुविधांसह वैद्यकीय मदत सुरू करण्यात आली. आता गुजरातमध्येही Reliance Foundation च्या वतीने कोविड रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येत आहे. कोरोना रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.
रिलायन्स फाउंडेशनची कोविड काळात सर्वाधिक मदत; मुंबईत 875 बेड्सची सुविधा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mukesh ambani, Reliance