मुकेश अंबानी जगातल्या सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत; TIME च्या लिस्टमध्ये समावेश

मुकेश अंबानी जगातल्या सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत;  TIME च्या लिस्टमध्ये समावेश

TIME मॅगझीनने जगातल्या 100 सर्वात प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामी या भारतीयांचा समावेश आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 18 एप्रिल : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं नाव जगातल्या 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. The Time 100 Most Influential People 2019 list  नावाने ही यादी टाईम मॅगझीनने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जगभरातील राजकीय नेते, कलाकार, खेळाडू, धोरणकर्ते यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप, पोप फ्रान्सिस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, गोल्फ खेळाडू टायगर वुड्स, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश या 100 Most Influential People यादीत आहे.

TIME मॅगझीनने जगातल्या 100 सर्वात प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामी या भारतीयांचा समावेश आहे. काटजू आणि गुरुस्वामी या भारतातल्या LGBTQ संबंधीच्या कायदेशीर मोहिमेला ऐतिहासिक यश मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.

अंबानी यांच्याविषयी TIME मॅगझीनच्या या लेखात लिहिताना महिंद्रा ग्रूपचे चेअरमन आनंद महेंद्र यांनी म्हटलंय की, 'वडील धीरुभाई अंबानी यांनी सुरू केलेला रिलायन्स उद्योग जागतिक स्तरावर नेताना प्रत्येक प्रकल्पाबरोबर मुकेश यांनी वाढती महत्त्वाकांक्षा ठेवली. मुकेश यांनी सुरू केलेल्या रिलायन्स जिओ नेटवर्कची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत 28 अब्ज लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे आणि 4G ची गरज कमी दरात देण्याची ही योजना दर्जात्मकरीत्या अव्वल आहे.'

अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी या लैंगिक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या आणि कार्यकर्त्यांबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने लिहिलं आहे. देशात LGBT समुदायाच्या अधिकारासाठी मूलभूत काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे या समुदायाच्या लढ्याला मोठं यश मिळालं. भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 मध्ये बदल केले आणि गे राईट्सला स्थान दिलं हे या लढ्याचं यश आहे, असं प्रियांकाने या दोघींबद्दल लिहिलं आहे.

टाईम मॅगझीनच्या या प्रभावी व्यक्तींच्या यादीत अबूधाबीचे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामाफोसा यांच्यासमवेत अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची पत्नी मिशेल ओबामा, गायिका- अभिनेत्री लेडी गागा यांचाही समावेश आहे.

First published: April 18, 2019, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading