नवी दिल्ली,30 आॅक्टोबर : रिलायन्य इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (CMD) मुकेश अंबानी नवी दिल्लीत आयोजित २४ व्या MobiCom काँफ्रेसमध्ये सहभागी झाले होते. मोबाईल, कॅम्प्युटर, नेटवर्क्स आणि एल्गोरिदमच्या क्षेत्रात मोबिकॉमचे जगात महत्त्वाचे अंग आहे. मी नारायण मूर्ती यांचा खूप आदर करतो. त्यांचे भारताला ग्लोबल आयटी मॅपवर आणण्यामध्ये मोठे योगदान आहे. आज आपला जीडीपी ३ ट्रिलियन डॉलरच्या जवळपास आहे. भारत, हा जगातील तीन सर्वात श्रीमंत देशापैकी एक होण्याच्या मार्गावर आहे असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
तसंच यावेळी त्यांनी डेटा कनेक्टिव्हिटीसाठी मोठी घोषणा केली आहे. २०१९ पर्यंत भारतात ९९.९ टक्के जनतेकडे हायस्पीड डेटा कनेक्टिव्हिटी असणार आहे अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
जिओ हे डिजीटल अभियान
आता आपल्या अर्थव्यवस्थेला सर्वच क्षेत्रात नव्याने डिजीटल सुरूवात करण्याची संधी आहे. मग ती आर्थिक सेवा असो, उत्पादन, कृषी, शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्र असो, भारत या सर्व क्षेत्रात अव्वल बनू शकतो. भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. जिओ हा एक व्यवसाय नाही तर डिजीटल अभियान आहे. पुढील दोन दशकात भारत हा जगाचं नेतृत्व करेल असं मत अंबानींनी व्यक्त केलं.
आजची तरुणपिढी हाच भारत
आजचा भारत उद्याच्या भारतापेक्षा वेगळा असणार आहे. आजची तरुणपिढी हाच भारत आहे. ६३ टक्के संख्या ३५ वर्षांच्या वयाखालील आहे. भारत एक विशाल टेक-सेव्ही तरूण जनसंख्या हीच ताकद आहे. भारताच्या विकासात सर्वांची भागीदारी आहे असंही मुकेश अंबानी म्हणाले.
जेव्हा नारायण मूर्ती यांनी मला फोन करून रोहन मूर्तीशी भेटण्यासाठी आणि मोबीकॉम २०१८ मध्ये प्रमुख वक्त म्हणून विचारलं असता मी लगेच होकार दिला. मला पूर्ण विश्वास आहे की, जगात जर कुठे डिजीटायझेशनचा मदतीतून दररोज बदल होत आहे तर ते भारतात होत आहे असं मतही मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं.