मुंबई, 10 डिसेंबर : मुकेश आणि नीता अंबानी यांना एक मोठी गुडन्यूज घरातूनच मिळाली. त्यांचा मुलगा आकाश आणि सून श्लोका यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं धूमधडाक्यात लग्न झालं होतं. आता त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. श्लोका यांनी मुंबईच्या रुग्णालयात मुलाला जन्म दिला. आई आणि मुलाची तब्येत उत्तम असल्याचं मुकेश अंबानी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
अंबानी परिवारातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, श्लोक आणि आकाश अंबानी हे आज आई-बाबा झाले आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांना पहिल्यांदाच आजी-आजोबा म्हणून बढती मिळाली आहे. "धीरुभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या नातवाचं परिवारात स्वागत आहे. या नव्या पाहुण्याच्या येण्यामुळे अंबानी आणि मेहता कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत", असं या निवेदनात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani