बाबरचे वंशज देणार राम मंदिरासाठी सोन्याची वीट!

मोगल वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी अयोध्या(Ayodhya) येथे राम मंदिर (Ram Mandir) उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 09:48 PM IST

बाबरचे वंशज देणार राम मंदिरासाठी सोन्याची वीट!

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: मोगल साम्राज्याचा अखेरचा बादशाह (Last Mughal Emperor)बहादुर शाह जफर (Bahadur Shah Zafar)चे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी अयोध्या(Ayodhya) येथे राम मंदिर (Ram Mandir) उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुसी यांनी सांगितले की जर अयोध्यामध्ये राम मंदिराची निर्मिती झाली तर त्यांच्या कुटुंबाकडून या मंदिरासाठीची पहिली वीट देईल. त्याशिवाय मंदिरासाठी सोन्याची वीट देणार असल्याचे तुसी म्हणाले. काहीच दिवसांपूर्वी तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात पक्षकार होण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका मंजूर केली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तुसी यांनी असा दावा केला की, ज्या राम जन्मभूमीवरून वाद सुरू आहे. त्याची मालकी हक्क असल्याचा पुरावा कोणाकडेच नाही. अशा परिस्थितीत मुगल वंशचे वंशज असल्याच्या नात्याने त्यांना स्वत:ची बाजू कोर्टासमोर सागायची आहे. तुसी यांच्या मते कोर्टाने त्यांची बाजू केवळ ऐकूण घ्यावी. मला फक्त माजी बाजू मांडायची आहे. कोर्टाने केवळ एकदा माझी बाजू नीट ऐकूण घ्यावी, असे ते म्हणाले.

तुसी यांचा धक्कादायक दावा

तुसी यांनी सांगितले की 1529 मध्ये प्रथम मुगल शासक असलेल्या बाबर(First Mughal Emperor Babar)ने त्याच्या सैनिकांना नमाज पढण्यासाठी बाबरी मशीदी(Babri Masjid)ची निर्मिती केली होती. हे ठिकाण केवळ सैनिकांसाठी होते आणि अन्य कोणालाही येथे नमाज पढण्याची परवानगी नव्हती. अर्थात त्यांनी या ठिकाणी मशीदीच्या आधी काय होते या वादावर पडण्यात त्यांनी नकार दिला. पण जर हिंदूंना असे वाटत असेल की त्या ठिकाणी श्री राम यांचा जन्म झाला आहे तर एक सच्चा मुस्लिम होण्याच्या नाते त्यांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे.

Loading...

मंदिरासाठी जमीन द्या

ज्या जागेवरून वाद सुरू आहे त्याची मालकी हक्का कोणाकडे आहे याची कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. या जागेचे मालकी हक्क असलेली कागदपत्रे माझ्याकडे देखील नाहीत. पण मुगल वंशचा उत्तराधिकारी असल्याने या जामिनीचा मालक ते असू शकतात. जर तसे असेल तर आणि ही जमीन जर मला त्यांना मिळाली तर ते मंदिरासाठी जागा दान देतील असे, तुली यांनी सांगितले.

2.77 एकरावरून सुरू आहे वाद

सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून अयोध्या प्रकरणी नियमीत सुनावणी सुरू आहे. सर न्यायाधिश रंजन गोगोई (CJI Ranjan Gogoi)यांच्या अध्यक्षते खालील 5 सदस्यीय खंडपीठा समोर सुरू आहे. ही सुनावणी 2.77 एकर जागेसंदर्भात आहे.

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माय लेकरांच्या सुटकेचा थरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 09:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...