बालाकोट हवाई हल्ल्यात 'कंधहार'चा मास्टर माईंड युसूफ अझर ठार

बालाकोट हवाई हल्ल्यात 'कंधहार'चा मास्टर माईंड युसूफ अझर ठार

भारताच्या ताब्यात असलेल्या मसूद अझरला सोडवण्यासाठी युसूफ अझरने अनेक प्रकारे खटाटोप केले होते.

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी :  भारताच्या हवाई हल्ल्यात ‘जैश ए मोहम्म्द’ या संघटनेचा दहशतवादी मौलाना युसूफ अझर ठार झाल्याचा दावा लष्कराने केला आहे. युसूफ अझर हा ‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझरचा मेव्हणा आहे. युसूफ अझर काश्मीरमध्ये ‘जैश’ चा तळ चालवत असे. हाच युसूफ अझर १९९९ च्या कंदहार विमान अपहरणाचा सूत्रधार होता. मुफ्ती अझहर खान काश्मीरी आणि इब्राहिम अझहर हे दोघही भारताच्या हल्ल्यात ठार झाले.

इंडियन एअरलाइन्सचं IC 814 हे विमान अफगाणिस्तानमधल्या कंदहारमध्ये नेण्यात आलं होतं. या अपहरण प्रकरणानंतर भारताने कैदेत असलेल्या मसूद अझरला सोडलं होतं.

भारताच्या ताब्यात असलेल्या मसूद अझरला सोडवण्यासाठी युसूफ अझरने अनेक प्रकारे खटाटोप केले होते.

तुरुंग फोडून मसूद अझरला बाहेर काढण्याचा त्याचा इरादा होता. पण त्यात अपयश आल्याने त्याने कंदहार विमान अपहरणाचा प्लॅन बनवला आणि नेपाळहून विमानाचं अपहरण केलं.

इंडियन एअरलाइन्सचं हे विमान २४ डिसेंबर १९९९ ला काठमांडूहून दिल्लीला निघालं होतं. त्यावेळी या विमानाचं अपहरण करण्यात आलं. या विमानात १७९ प्रवासी आणि ११ कर्मचारी होते.

हे विमान पाकिस्तानच्या दिशेनं नेण्यात येत असताना अमृतसर, लाहोर आणि दुबईला उतरवण्यात आलं होतं.

हे अपहरणनाट्य आठवडाभर चाललं आणि त्यानंतर मसूद अझर, अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक झरगर आणि अहमद ओमर सईद शेख या तिघांची सुटका करण्यात आली. अहमद ओमर सईद शेख हा अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल याच्या हत्याप्रकरणात दोषी आहे.

बालाकोटच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यात ‘जैश ए मोहम्म्द’ चे अतिरेकी, प्रशिक्षक, कमांडर्स आणि जिहादी मारले गेले. या तळावर या सगळ्यांचं आत्मघातकी हल्ल्यांसाठी प्रशिक्षण घेतलं जायचं. बालाकोटचा हा तळ ‘जैश ए मोहम्मद’ चा सर्वात मोठा तळ आहे.

First published: February 26, 2019, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading