श्रीनगर, 6 एप्रिल : सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरी दिवसेंदिवस वाढतच आहेत. शनिवारी (6 एप्रिल) सकाळीदेखील शोपियाँ जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शोपियाँ जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण एम.टेकचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहिल राशिद शेख असं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. तो नूनर गांदरबल परिसरातील राहणारा होता. धक्कादायक बाब म्हणजे राहिलनं 3 एप्रिल (2019) रोजीच हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.तर दुसरा दहशतवाद्याचं नाव बिलाल अहमद असं असून तो शोपियाँ जिल्ह्यातील किगाम येथील राहणारा होता.
Visuals: Two terrorists killed in exchange of fire between terrorists and security forces in Imam Sahib area of Shopian district. (Visuals deferred by unspecified time) #JammuAndKashmirpic.twitter.com/s7l5vnifMS
Jammu & Kashmir: Two terrorists killed in exchange of fire between terrorists and security forces in Imam Sahib area of Shopian district. pic.twitter.com/ISv9nYQF0w