MS धोनी राजकारणात येणार? भाजपच्या खासदाराने दिला निवडणूक लढण्याचा सल्ला!

MS धोनी राजकारणात येणार? भाजपच्या खासदाराने दिला निवडणूक लढण्याचा सल्ला!

MS Dhoni: 'धोनी हा लढवय्या आहे. त्याच्याकडे अडचणींवर मात करण्याची क्षमता आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची त्याच्यात क्षमता आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 16 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या एम.एस. धोनीच्या (MS Dhoni) निर्णयाचे देशभर पडसाद उमटत आहेत. सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवरांनी धोनीच्या खेळाचं कौतुक करत भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे दिग्गज नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy ) यांनी धोनीच्या कामगिरीचं कौतुक करत त्याला राजकारणात येण्याचा सल्ला दिलाय. धोनी हा लढवय्या आहे, त्याच्या सारख्या माणसांची समाजाला गरज आहे, त्याने लोकसभेची 2024ची निवडणुक (2024 Lok sabha elections) लढवली पाहिजे असा सल्लाही त्यांनी धोनीला दिलाय.

निवृत्तीच्या घोषणेनंतर धोनीने मात्र याबाबतीत अजुन कुठलेली संकेत दिलेले नाहीत.

स्वामी म्हणाले, धोनी हा लढवय्या आहे. त्याच्याकडे अडचणींवर मात करण्याची क्षमता आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता त्याने सिद्ध केली आहे. त्याच्यासारख्या माणसांची समाजाला गरज आहे.

त्यामुळे धोनीने लोकसभेची 2024ची निवडणू लढविली पाहिजे असंही स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे धोनी राजकारणात येणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

भारतीय क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार एम.एस.धोनी याच्या निवृत्तीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मैदानात आपल्या बॅटीची कमाल दाखविणारा माही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाही याची सर्वांनाच मोठी खंत आहे.

माहीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सचिनने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याची आठवण जागी केली तर सेहवानने ना कोई है ना कोई था MS के जैसा म्हणत माहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 16, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या