मराठी बातम्या /बातम्या /देश /घ्या आता! स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीतच विसरले खासदार; स्थानिकांनी VIDEO केला व्हायरल

घ्या आता! स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीतच विसरले खासदार; स्थानिकांनी VIDEO केला व्हायरल

वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले खासदार आता स्वत:च वादात सापडले

वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले खासदार आता स्वत:च वादात सापडले

वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले खासदार आता स्वत:च वादात सापडले

मुरादाबाद, 16 ऑगस्ट : वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारे मुरादाबाद येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉक्टर एसटी हसन स्वातंत्र्य दिनी देशाचं राष्ट्रगीत विसरले. पहिल्या ओळींनंतर थेट जय हो जय हो म्हणून त्यांनी राष्ट्रगीत संपवलं. या वरुन संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी स्वातंत्र्य दिनी खासदार डॉक्टर एसटी हसन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी गल शहीद पार्कात पोहोचले होते.

येथे त्यांनी ध्वजारोहण केलं. यानंतर जसं राष्ट्रगीत सुरू झालं, त्यांच्यासोबत असलेले लोक राष्ट्रगती चक्क विसरून गेले. पहिल्या काही ओळी म्हटल्यानंतर ते शेवटी जय हे जय हे म्हणून राष्ट्रगीत संपवलं आणि निघून गेले. खासदारांच्या या प्रसंगावर अनेकांनी राग व्यक्त केला आहे. देश चालवणारे लोकच जर राष्ट्रगीत विसरले तर सर्वसामान्यांचा काय संदेश दिला जात आहे. (MPs forgot national anthem in Independence Day program Locals VIDEO went viral )

" isDesktop="true" id="592873" >

हे ही वाचा-..तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंची घोषणा

खासदाराच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रमादरम्यान लोक त्यांचा व्हिडीओ शूट करीत होते. यावेळी राष्ट्रगीत म्हणताना अडखणाऱ्या खासदाराचं चित्र व्हिडीओमध्ये कैद झालं. यानंतर हा व्हिडीओ लोकांनी व्हायरल केला. या प्रकरणात खासदार म्हणाले की, मी त्या कार्यक्रमात मुख्य पाहुणा म्हणून गेलो होतो. तेथील लोक राष्ट्रगीत विसरले. मी त्यांना रोखलं आणि पुन्हा म्हणण्यास सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि कार्यक्रम संपवून निघून गेले. मला संपूर्ण राष्ट्रगीत आताही लक्षात आहे.

First published:
top videos

    Tags: Independence day, Viral video.