उदयनराजे दिल्लीत, पवारांसोबतच्या बैठकीत ठरला मास्टर प्लॅन?

उदयनराजे दिल्लीत, पवारांसोबतच्या बैठकीत ठरला मास्टर प्लॅन?

बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही तिकीट देण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी  शरद पवारांची सातारच्या पत्रकारांसमवेत दिल्लीत भेट घेतली. उदयनराजेंचं तिकीट फायनल असल्याचे संकेत यावेळी शरद पवारांनी दिले. माढा मतदार संघ शरद पवारांनी कदाचीत फायनल केल्यामुळेच उदयनराजेंना सातारामधून शरद पवारांनी ग्रिन सिग्नल दिला अशा सध्या चर्चा आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत असलेल्या 11 मतदारसंघात कोण उमेदवार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. यात विद्यमान 5 खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं.

बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही तिकीट देण्यात येणार आहे. तर माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांचं नाव निश्चित करण्याची शक्यता होती. पण त्या पदासाठी खुद्द शरद पवारच इच्छुक होते. तर नाशिकमधून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. समीर भुजबळ अलीकडेच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 2 वर्ष तुरुंगात होते. ते जामिनावर बाहेर आले आहे. हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीने मित्रपक्षाला जागा सोडली आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहे.

हेही वाचा : 'हे' गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी; VIDEO VIRAL

पहिल्या यादीतील उमेदवार असे

1) बारामती - सुप्रिया सुळे

2) कोल्हापूर - धनंजय महाडिक

3) सातारा - उदयनराजे भोसले

4) माढा-विजयसिंह मोहिते-पाटील

5) रायगड - सुनील तटकरे

6) बुलढाणा - राजेंद्र सिंगणे

7) नाशिक - समीर भुजबळ

8) ठाणे - संजीव नाईक

9) उस्मानाबाद - अर्चना पाटील / राणा जगजित

10) ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील

11) हातकणंगले - राजू शेट्टी

12) गोंदिया - वर्षा पटेल / मधुकर कुकडे

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह एकाच गाडीतून प्रवास केला होता. यावेळी मनोमिलन घडवण्यासाठी पवार यांनी या दोघांना सोबत घेतलं असल्याची माहिती समोर येत होती.

VIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर

First published: February 9, 2019, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading