मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार तिथंच काँग्रेस नेत्यांचा राडा, पाहा हाणामारीचा VIDEO

मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार तिथंच काँग्रेस नेत्यांचा राडा, पाहा हाणामारीचा VIDEO

मुख्यमंत्री ध्वजारोहण करण्याआधी स्टेजवर जाण्यावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाला आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून दोघांनाही शांत केलं.

  • Share this:

इंदौर, 26 जानेवारी : मध्यप्रदेशमधील इंदौर इथं काँग्रेसचे कार्यालय गांधी भवनमध्ये ध्वजारोहणावेळी गोंधळ निर्माण झाला. पक्षाचे दोन नेतेच एकमेकांवर धावून गेल्याचा प्रकार घडला. पक्षाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं. यावेळी घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

काँग्रेसचे नेते देवेंद्र सिंग यादव आणि चंदू कुंजीर एकमेकांवर धावून गेले. या व्हिडिओमध्ये चंदू कुंजीर यांनी देवेंद्र सिंग यांना कानाखाली लगावल्याचं दिसंत आहे. यानंतर वाद आणखी वाढला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं.

मुख्यमंत्री कमलनाथ ध्वजारोहण करणार होते तिथंच हा प्रकार घडला. कमलनाथ या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळीच इंदौरमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री पोहोचताच कुंजीर 15-15 लोकांसह मंचावर जात होते. त्यावेळ यादव यांनी कुंजीर यांना अडवल्याने वाद झाला. काँग्रेस नेते आणि पोलिसांनी यात हस्तक्षेप केला.

काश्मिरमध्ये असं काय झालं की काही तासांतच पुन्हा सरकारने केली इंटरनेटबंदी

पोलिसांनी कुंजीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोरीने तयार केलेल्या बॅरिकेट्सच्या बाहेर पाठवलं. यादव यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ध्वजारोहण केलं.

...म्हणून वडिलांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘छब्बीस जनवरी’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2020 04:24 PM IST

ताज्या बातम्या