भोपाळ, 14 ऑक्टोबर: राजकीय नेते, नेत्या दररोज अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. या कार्यक्रमांत ते भाषणं देतात, पुरस्कार देतात, सरकारी अनुदानाचे चेक वाटतात. क्वचित क्रिकेट सामन्यांच्या उदघाटनावेळी बॅटिंगही करतात. पण कबड्डी सामन्यांचं उदघाटन असेल तर कबड्डी खेळताना दिसत नाहीत. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांनी मात्र खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी खेळल्याची बातमी सध्या सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. प्रज्ञासिंह यांना अनेक आजार असल्याने त्या साधारणपणे व्हीलचेअरमध्ये बसूनच सगळीकडे प्रवास करतात पण भोपाळमधल्या (Bhopal) एका कार्यक्रमात मात्र त्या कबड्डी खेळल्या. याबाबतचं वृत्त एनडीटीव्ही इंडियाने दिलं आहे.
भोपाळमधील शक्तीनगर परिसरात बुधवारी काली मातेच्या दर्शनासाठी प्रज्ञासिंह गेल्या होत्या. देवीचं दर्शन आणि विधीवत पूजा त्यांनी केली. त्यानंतर त्या शेजारच्या शक्तीनगरच्या मैदानात गेल्या आणि तिथे कबड्डी खेळणाऱ्या कबड्डीपटूंशी ओळख करून घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. खेळाडूंनी त्यांना विनंती केल्यावर महिला कबड्डीपटूंसोबत प्रज्ञासिंह या स्वत: कबड्डी (MP Pragya Singh Thakur playing Kabaddi) खेळल्या. त्यांनी एक एंट्री टाकली. त्यामुळे उपस्थित सर्वांनाच खूप आनंद झाला.
कल गरबा आज भोपाल सांसद @SadhviPragya_MP आज मां काली के दर्शन के लिए पहुंचीं,वहां ग्राउंड में मौजूद खिलाड़ियों के अनुरोध पर महिला खिलाड़ियों के साथ कबड्डी खेली। pic.twitter.com/X1wWOg55aW
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) October 13, 2021
प्रज्ञा यांनी या कबड्डीपटूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलवून त्यांचा गौरव केला. या आधी जुलै महिन्यात प्रज्ञासिंह या शक्तीनगरमध्ये एका कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी खासदार प्रज्ञासिंह यांनी बास्केटबॉलच्या मैदानावर जाऊन बॉल ड्रिबलिंग करत तो बास्केटबॉलच्या जाळ्यात (MP Pragya Singh Thakur playing Basketball) टाकला होता. त्यावेळीही उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या क्रीडाकौशल्याचं कौतुक केलं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या प्रवक्त्यानेही त्यांना बास्केटबॉल खेळताना पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा- पाकिस्तानचा जुगाड, Video बघून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी केलेल्या प्रचंड मारहाणीनंतर प्रज्ञासिंह या अनेक आजारांनी ग्रस्त झाल्या आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती. सध्या आजारांमुळे त्या नीट चालू शकत नाहीत त्यामुळे बरेचदा व्हील चेअरवरूनच प्रवास करतात. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी कबड्डी खेळल्यामुळे सर्वांना विशेष आनंद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP