Home /News /national /

धक्कादायक! मोबाइल चार्ज करताना Power Bank चा स्फोट; जागेवरच तरुणाने सोडला जीव

धक्कादायक! मोबाइल चार्ज करताना Power Bank चा स्फोट; जागेवरच तरुणाने सोडला जीव

येथे एका 28 वर्षांचा तरुण जबर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

    उमरिया, 6 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उमरिया येथून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे एका 28 वर्षांचा तरुण जबर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पॉवर बँकसारख्या दिसणाऱ्या डिव्हाइसमध्ये ब्लास्ट (Blast In Power Bank Like Device) झाला. शुक्रवारी हा प्रकार घडला. अद्याप ब्लास्ट झालेलं डिव्हाइस पॉवर बँक होतं की अन्य काही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सब डिव्हिजनल ऑफिसर ऑफ पोलीस भारती जाट यांनी सांगितलं की, पीडित राम साहिल पाल याला पॉवर बँकसारखी एक वस्तू घरातील शेतात पडलेला मिळाला. त्यांनी पुढे सांगितलं की, रामने आपल्या शेजारच्यांच्या घरी जाऊन जेव्हा डिव्हाइसमध्ये चार्जरसह आपला मोबाइल लावला तर मोठा स्फोट झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात राम गंभीर झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे ही वाचा-भाजप नगरसेवकाचं धक्कादायक कृत्य; भररस्त्यात महिला तलाठीला मारहाण, Video व्हायरल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनास्थळी सापडलेलं डिव्हाइस फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासासाठी पाठविण्यात आलं आहे. ज्यातून हा पॉवर बँक होता की अन्य वस्तू याबाबत नेमका खुलासा होईल. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा डिव्हाइस एक्सप्लोसिव नव्हता. तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Death, Madhya pradesh, Mobile

    पुढील बातम्या