Home /News /national /

'....तर वाईट परिणाम होतील’, पोलीस कॉन्स्टेबलला दिली बायकोने धमकी!

'....तर वाईट परिणाम होतील’, पोलीस कॉन्स्टेबलला दिली बायकोने धमकी!

लग्नासाठी रजा मिळावी म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या अर्जात त्यांनी चक्क बायकोने दिलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे.

    लभोपाळ , 9 डिसेंबर:   सध्या देशभर लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. कोराना व्हायरसमुळे (COVID19) संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊन (Lockdown) मध्ये गेला. लॉकडाऊनमध्ये लांबणीवर पडलेली लग्नही सध्या उरकली जात आहेत. नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. लग्नासाठी रजा मिळावी म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या अर्जात त्यांनी चक्क बायकोने दिलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे. दिलीप कुमार आहिरवार असे या त्यांचे नाव असून ते भोपाळ शहरात ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल आहेत. दिलीप कुमार यांच्या मेहुण्याचे 11 डिसेंबरला लग्न असून त्यासाठी पाच दिवसांची रजा मिळावी म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज केला होता. बायकोच्या धमकीचा अर्जात उल्लेख ‘मी भोपाळमधील वाहतूक विभागात काम करत असून माझ्या सख्ख्या मेहुण्याचे 11 डिसेंबर रोजी लग्न आहे. त्या लग्नाला उपस्थित राहणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक असून, कृपया यासाठी मला पाच दिवसांची रजा मंजूर करावी’, असे दिलीप कुमार यांनी अर्जाच्या सुरुवातीला लिहिले आहे. (हे वाचा-शिवाजीराव भोसले बँकेच्या ठेवीदारांना दिलासा? सहकार विभागाने दिला नवा प्रस्ताव) रजेच्या सर्वसाधारण मसुद्यासारखा पहिला परिच्छेद असला तरी त्यांनी त्यापूढे जोडलेल्या नोटमुळे तो व्हायरल झालाय. ‘भावाच्या लग्नात आला नाहीत तर परिणाम चांगला होणार नाही, असे अर्जदाराच्या पत्नीने स्पष्ट केले आहे’ अशी नोट त्यांनी या अर्जात दिली आहे. ही नोट किती खरी आहे याची पडताळणी अजून झालेली नाही. मात्र लिहिण्याच्या शैलीवरुन ती दिलीप कुमार यांनीच लिहिली असल्याची शक्यता आहे. भोपाळ पोलिसांना अलर्ट देशात सध्या सर्वत्र शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद देखील पुकारला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील पोलिसांना सध्या अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टमुळे सुट्टी मिळण्यास अडचण येऊ शकते असा अंदाज दिलीप कुमार यांना होता. त्यामुळेच त्यांनी पत्नीने दिलेल्या धमकीचा अर्जात उल्लेख केला असावा असा अंदाज आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या