Home /News /national /

‘प्रिय चोरा', गावकऱ्यांनी लिहिलं इमोशनल पत्र... अंतिम सत्याची करुन दिली आठवण!

‘प्रिय चोरा', गावकऱ्यांनी लिहिलं इमोशनल पत्र... अंतिम सत्याची करुन दिली आठवण!

गावकऱ्यांनी चोराला उद्देशूनच हे पत्र लिहिलं आहे. ‘नेमका चोर कोण आहे?’ हे माहिती नसल्यानं गावातील अनेक घरांवर हे पत्र चिकटवण्यात आलं आहे.

    भोपाळ,11 डिसेंबर : चोरी करुन पसार झालेल्या चोराला पकडण्यासाठी सर्व प्रथम पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली जाते. काही अट्टल चोर पोलिसांनाही सहजासहजी सापडत नाहीत. त्यांची माहिती देण्यासाठी लोकांनी पुढं यावं म्हणून त्यासाठी मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर केलं जातं. चोराचे वर्णन करणारी माहिती आणि त्याला पकडून दिल्यास मिळणारी रक्कम याचे पोस्टर्स सगळीकडं लावले जातात. मात्र, चोरीचा माल परत आणून देण्यासाठी चोराला उद्देशूनच पत्र लिहिल्याचा एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेश (M.P.) मधील बैतूल जिल्ह्यातील एक पत्र सध्या चांगलीच व्हायरल झालं आहे. येथील गावकऱ्यांनी चोराला उद्देशूनच हे पत्र लिहिलं आहे. ‘नेमका चोर कोण आहे?’ हे माहिती नसल्यानं गावातील अनेक घरांवर हे पत्र चिकटवण्यात आलं आहे. कोणत्या तरी घरावरंच पत्र तो चोर वाचेल आणि चोरलेलं साहित्य परत आणून देईल अशी गावकऱ्यांना आशा आहे. चोराला पत्र का लिहिले? बैतूलमधल्या मलकापूरच्या गावकऱ्यांनी स्मानशभूमी सुंदर करण्यासाठी तिथं झाडं लावली आहेत. गावातील जुन्या मंडळींच्या आठवणीसाठी एकूण 70 झाडं आजवर लावण्यात आली आहेत. या सर्व झाडांना पाणी देण्यासाठी गावकऱ्यांनी गावाच्या निधीमधून पाईप घेतले होते. चोरांनी ते पाईपच लंपास केले. या चोरीचा तपास करण्यात पोलीस अपयशी ठरल्यानं त्यांनी चोराला उद्देशून पत्र लिहिले आहे. हे वाचा-ऑनलाइन परिक्षेत मिळाले कमी गुण, 12 वर्षीय मुलाने केली आत्महत्या पत्राचा मजकूर काय? एखाद्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहिताना करतो तशी, ‘प्रिय चोर,’ या वाक्यानं या पत्राचीही सुरुवात केली आहे. चोराला प्रिय म्हणून इमोशनल करतानाच तुला एक दिवस याच मोक्षधाममध्ये (स्माशानात) यायचे आहे. त्यामुळे चोरलेलं साहित्य चुपचाप परत करुन जा, अशी सूचना गावकऱ्यांनी दिली आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. मृत्यूनंतर प्रेताला स्माशानात आणले जाते. या अंतिम सत्याची गावकऱ्यांनी या पत्रातून चोराला आठवण करुन दिली आहे. हे अंतिम सत्य समजल्यानंतर तरी चोर मोह सोडून साहित्य परत करेल अशी गावकऱ्यांना आशा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Madhya pradesh

    पुढील बातम्या