Home /News /national /

मुलगी झाली हो! कन्यारत्न झालं म्हणून पेट्रोल पंप मालक देतोय एक्स्ट्रा पेट्रोल

मुलगी झाली हो! कन्यारत्न झालं म्हणून पेट्रोल पंप मालक देतोय एक्स्ट्रा पेट्रोल

बैतूल पेट्रोल पंप, फोटो सौजन्य-AT

बैतूल पेट्रोल पंप, फोटो सौजन्य-AT

या पेट्रोलपंपावर 5% ते 10% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे म्हणून ही ऑफर नसून यामागचं कारण खास आहे.

    भोपाळ, 15 ऑक्टोबर: पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होते आहे. सामान्यांसाठी हे भाव तर परवडणारे नाहीच आहेत. आज देशातील अनेक शहरात पेट्रोल 110 रुपयांपार तर डिझेलनेही शंभरी गाठली आहे. दरम्यान एका पेट्रोलपंपावर  5% ते 10% पर्यंत अधिक पेट्रोल देण्यात येत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे म्हणून ही ऑफर नसून यामागचं कारण खास आहे. एका पेट्रोलपंप मालकाने ही ऑफर देऊ केली आहे. मध्यप्रदेशमधील बैतूल (Madhya Pradesh Latest News) याठिकाणी हा पेट्रोल पंप असून, घरी मुलीचा जन्म झाला म्हणून हे अधिकचे पेट्रोल वितरीत करण्यात येते आहे. बैतूलमधील सेनानी कुटुंबीय त्यांच्या घरी मुलीच्या जन्माचं स्वागत करत आहेत. या नवीन पाहुण्याचे स्वागत करताना, त्यांनी त्यांच्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना एस्ट्रा पेट्रोल दिलं निर्णय आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांनाही त्यांनी त्यांच्या आनंदात सामील करुन घेतलं आहे. राजेंद्र सेनानी यांच्या घरी भाची शिखा हिचा नवरात्रीमध्ये जन्म झाला आणि घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे वाचा- Petrol-Diesel Price today:दसऱ्याच्या मूहुर्तावर आज पुन्हा भडकले पेट्रोल-डिझेल दर मुलीच्या जन्माचा सोहळा व्हावा याकरता त्यांनी थेट अधिक पेट्रोल वितरित करण्यास सुरुवात केली. याठिकाणी 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एस्ट्रा पेट्रोल दिलं जात आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा- हॉस्पिटलच्या Tolietमध्ये डिलिव्हरी, बाळाचे पाय पकडून रडत राहिले वडील याठिकाणी एखाद्या ग्राहकाने 100 रुपयाचे पेट्रोल खरेदी केले तर त्याला 105 रुपयांचे पेट्रोल देण्यात येत आहे. तर 100 रुपयांपेक्षा अधिकचे पेट्रोल खरेदी केल्यावर 10 टक्के एक्स्ट्रा पेट्रोल मिळते आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या