Home /News /national /

नवनीत राणाची सनी देओल स्टाइल, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत आक्रमक

नवनीत राणाची सनी देओल स्टाइल, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत आक्रमक

**EDS: TV GRAB** New Delhi: Lok Sabha MP from Amravati, Navneet Rana, speaks during discussion on the resolution to revoke Article 370, in the Lok Sabha, in New Delhi, Tuesday, Aug 6, 2019. (LSTV/PTI Photo) (PTI8_6_2019_000141B)

**EDS: TV GRAB** New Delhi: Lok Sabha MP from Amravati, Navneet Rana, speaks during discussion on the resolution to revoke Article 370, in the Lok Sabha, in New Delhi, Tuesday, Aug 6, 2019. (LSTV/PTI Photo) (PTI8_6_2019_000141B)

एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय.

  नवी दिल्ली 04 फेब्रुवारी : हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या अमानुष घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. खासदार नवनीत राणा यांनी हा प्रश्न आज संसदेत उपस्थित केला. अतिशय आक्रमक पद्धतीने राणा यांनी महिलांच्या सुरक्षेता मुद्दा लावून धरला. महिलांवर अत्याचार किती काळ सहन करायचा. हे अत्याचार बंद करायचे असतील तर अतिशयकडक कायदा केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणांवर तातडीने न्याय होत नाही. फक्त 'तारीख पे तारीख' असं सुरु असतं असं त्यांनी सांगितलं त्यावेळी सगळ्यांना आठवण झाली ती सनी देओल यांच्या चित्रपटातल्या डायलॉगची. योगायोग म्हणजे सनी देओलही आता खासदार आहेत. एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. श्वासनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतोय. व्यंगचित्र का काढत नाहीत राज ठाकरे? पुण्याच्या कार्यक्रमात केला खुलासा तिच्या डोळ्यालाही दुखापत झालीये. तिच्या चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेलाय. त्यामुळे तिची परिस्थिती गंभीर आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होतोय. कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केलाय. पण धोका अजुन टळलेला नाही. पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. महाविकास आघाडीचा भाजपला मोठा धक्का, आणखी एक जागा जिंकली काय आहे घटना? एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी लिकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Navneet rana

  पुढील बातम्या