Home /News /national /

शिवसेनेविरोधात बोलल्यानंतर नवनीत राणा यांना Acid Attackची धमकी, दिल्लीत तक्रार दाखल

शिवसेनेविरोधात बोलल्यानंतर नवनीत राणा यांना Acid Attackची धमकी, दिल्लीत तक्रार दाखल

Navneet Rana Acid Attack Threat: नवनीत राणा या लोकसभेत (Loksabha Budget Session) विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात.

    नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांना अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) करून जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र काही दिवसांपूर्वी आलं होतं. याप्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नवनीत राणा या लोकसभेत (Loksabha Budget Session) विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील सत्तेत असणाऱ्या शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात. 8 फेब्रुवारी रोजी देखील नवनीत राणा यांनी राज्यातील स्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर नवनीत राणा यांना एक पत्र आलं, ज्यामध्ये थेट जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती. '8 दिवसांत माफी मागा नाहीतर तुमच्यावर अ‍ॅसिड टाकून जीवे मारू,' अशा आशयाचं एक पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यू येथील घरी आलं होतं. या पत्रानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. हेही वाचा - मुंबई महापालिका निवडणुकीआधी नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीसांवर सर्वात गंभीर आरोप दरम्यान, टीका-टिपण्णी ही राजकीय क्षेत्रातील कामाचा एक भाग मानला जातो. मात्र अशा टीकेनंतर एका खासदाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याप्रकरणी पोलीस नक्की काय कारवाई करतात, हे पाहावं लागेल.
    First published:

    Tags: Delhi Police, Navneet Rana

    पुढील बातम्या