मराठी बातम्या /बातम्या /देश /

राणा पुन्हा हनुमान चालिसा पठन करणार, प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक, मान्सूनची नवी डेटलाइन TOP बातम्या

राणा पुन्हा हनुमान चालिसा पठन करणार, प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक, मान्सूनची नवी डेटलाइन TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 28 मे : खासदार नवनीत राणा आज नागपुरात येणार असून हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील कोणतीही प्रशासकीय बदली आता 30 जून पर्यंत करता येणार नाही. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने (Parlimetary Committee) घेतली आहे. मुंबई सेशन कोर्टातील (Mumbai Session Court) विशेष CBI कोर्टाने उद्योगपती अविनाश भोसले यांना 30 मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यंदा नेहमीपेक्षा मान्सून (MONSOON) लवकर येणार असे हवामान खात्याकडून (imd alert monsoon) सांगण्यात येत होते. मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू होती.

खासदार नवनीत राणा हनुमान चालिसा पठण

नागपुरात खासदार नवनीत राणा यांचे आगमन व हनुमान चालिसा पठण कार्यक्रम होणार आहे. जवळपास 2 वाजता त्यांचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होईल. त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान पठण कार्यक्रम सकाळी 12 वाजता सुरू होईल. तो पण राम नगरच्या मंदिरात आहे.

संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर

शिवसेना नेते संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कागल आणि कोल्हापुरात ते सभा घेणार आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने ते कोल्हापूर दौऱ्यावर असून विविध घटकांशी चर्चा करणार आहेत सकाळी ते खंडपीठाबाबत मिसळ पे चर्चा करणार आहेत तर दुपारी व्यापाऱ्यांशी कॉफी पे चर्चा करणार आहेत. या दरम्यान ते 12 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत तर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे.

राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) प्रशासकीय बदल्यांबाबत आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणतीही प्रशासकीय बदली आता 30 जून पर्यंत करता येणार नाही. अगदी एखादा अपवाद असेल आणि आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या परवानगीने एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली केली जाऊ शकते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

Modi@08: साडेतीन तास झोप, 18 तास काम, सकाळी या गोष्टीने करतात दिवसाची सुरुवात

नवनीत राणांच्या तक्रारीची दखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने (Parlimetary Committee) घेतली आहे. खार पोलीस ठाण्यात आपल्याला चुकीची वागणूक दिली गेल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता दिल्लीत फैसला होणार आहे. संसदीय समितीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्तांसह आणखी एका बड्या अधिकाऱ्याला 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. या सर्व बड्या अधिकाऱ्यांची आता दिल्लीत चौकशी होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

पंकजा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा महत्त्वाच्या भूमिकेत येणार?

निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या (MLA Election) 10 जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात 20 जूनला 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून संधी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

अविनाश भोसले यांना परवा रात्री सीबीआयने (CBI) अटक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर एक महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे. मुंबई सेशन कोर्टातील (Mumbai Session Court) विशेष CBI कोर्टाने उद्योगपती अविनाश भोसले यांना 30 मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

केरळमधील मान्सूनच्या आगमनाची IMD कडून नवी डेटलाइन

यंदा नेहमीपेक्षा मान्सून (MONSOON) लवकर येणार असे हवामान खात्याकडून (imd alert monsoon) सांगण्यात येत होते परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू होती. मान्सून (Monsoon Update) अरबी समुद्रात तब्बल सहा दिवसांपुर्वी दाखल झाल्यानंतर श्रीलकेजवळ थांबला होता. दरम्यान मान्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Monsoon, Navneet Rana