महिला मंत्री महोदयांचा 'मुझको राणा जी माफ करना' वर तुफान डान्स, VIDEO व्हायरल

महिला मंत्री महोदयांचा 'मुझको राणा जी माफ करना' वर तुफान डान्स, VIDEO व्हायरल

मध्य प्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

  • Share this:

भोपाळ, 05 डिसेंबर : मध्य प्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत इमरती देवी यांनी 'मुझको राणा जी माफ करना' गाण्यावर तुफान डान्स केला आहे.

आता इमरती देवी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे इमरती देवी यांनी  डान्स केला जर चुकीचं का आहे, असं म्हणत मध्य प्रदेश काँग्रेसने  पाठराखण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ डबरा मतदारसंघातील एका लग्नसोहळ्यातला आहे. इमरती देवी या नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही आपल्या बेधडक भाषणामुळे चांगल्याच चर्चेत होत्या. एवढंच नाहीतर मंत्री झाल्यानंतर डबरा येथील शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी त्यांनी  डॉक्टराची बदली केली तर खर्च जास्त होतो. त्यापेक्षा निलंबित केलं पाहिजे, असा निर्णय घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 07:18 PM IST

ताज्या बातम्या