तरुणाच्या अंगावरून गेल्या 3 रेल्वे, घटनास्थळी पोहोचलेले पोलिसही चक्रावले

तरुणाच्या अंगावरून गेल्या 3 रेल्वे, घटनास्थळी पोहोचलेले पोलिसही चक्रावले

दारुच्या नशेत तरुण चक्क रुळावरच झोपून गेला. त्यानंतर जेव्हा पोलिसांना याची माहिती समजली तोपर्यंत ट्रॅकवरून 3 रेल्वे गेल्या होत्या.

  • Share this:

भोपाळ, 23 ऑक्टोबर : रेल्वे ट्रॅकवर उभा राहून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. यामुळे पोलिसांना नेहमीच सावध रहावं लागतं. आता मध्य प्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत एकजण रेल्वे रुळावरच झोपला. मध्यप्रदेशातील अशोक नगर इथं ही घटना घडली. पोलिसांना रेल्वे रुळावर एकाचा मृतदेह आहे अशी माहिती देण्यात आली होती. पण पोलिस ज्यावेळी घटनास्थळावर पोहचले तेव्हा ती व्यक्ती उठून बाबा आले असं म्हणाल्यानं सगळेच चक्रावले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह असल्याची माहिती एका लोको पायलटने दिली. यानंतर पोलिस त्या ठिकाणी पोहचेपर्यंत तीन रेल्वे ट्रॅकवरून गेल्या होत्या. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. जेव्हा पोलिस त्या ठिकाणी पोहचले आणि रुळावर पडलेल्या तरुणाला उचलू लागले तेव्हा तो तरुण उठून बसला आणि बाबा आले असं म्हणाला.

पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव धर्मेंद्र आदिवासी असल्याचं समजलं. जास्त दारू प्यायल्याने आपण ट्रॅकवर झोपलो हेसुद्धा त्याला कळालं नव्हतं. पोलिसांनी त्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याची झोपच उडाली. अशोकनगर रेल्वे स्टेशनपासून 2 किमी लांब अंतरावर तो झोपला होता. या घटनेनंतर पोलिसांनी धर्मेंद्रची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला घरी सोडलं.

SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 11:12 AM IST

ताज्या बातम्या