एका लग्नाची अजब गोष्ट; एकाच मांडवात नवरदेवानं केलं दोघींशी लग्न

एका लग्नाची अजब गोष्ट; एकाच मांडवात नवरदेवानं केलं दोघींशी लग्न

प्रेयसी आणि कुटुंबाने पसंत केलेली मुलगी अशा दोघींशी हा तरुण विवाहबद्ध झाला.

  • Share this:

 भोपाळ, 10 जुलै : एकाच नवरदेवाचं एकाच मांडवात दोन जणींशी लग्न, हे कोणत्या फिल्ममध्ये नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात घडलं आहे. मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) नवरदेवाने एका मंडपात, एका मुहूर्तावर दोघींशी लग्न केलं आहे. यातील एक वधू त्याची प्रेयसी आहे आणि दुसरी वधू त्याच्या आईवडीलांनी पसंत केलेली. दोन्ही वधू आणि तिन्ही कुटुंबाच्या संमतीने सर्वांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप उइके असं या नवरदेवाचं नाव आहे. मूळचा बेतुल जिल्ह्याच्या घोडाडोंगरीतल्या केरिया गावातील असलेला संदीप भोपाळमध्ये शिकायला होता, तेव्हा होशांगाबादमधील तरुणीला तो भेटला आणि त्यांचं प्रेम जुळलं. त्याचवेळी त्याच्या कुटुंबाने कोल्यारी गावातील एक मुलगी पसंत केली आणि तिच्याशी संदीपचं लग्न ठरवलं. यानंतर बरेच वाद झाले. हा वाद पंचायतीपर्यंत गेला.

जर दोन्ही महिला एकत्र संदीपसह राहण्यास तयार असतील तर दोघींनीही त्याच्याशी लग्न करावं. आश्चर्य म्हणजे दोघीही या लग्नासाठी तयार झाल्या. पंचायतीच्या मध्यस्थीनंतर दोन्ही मुलींचं लग्न संदीपशी करायचं ठरलं.

हे वाचा - छत्रपती शिवरायांबाबत बोलताना तोल सुटला; 'त्या' कॉमेडियनने दिला माफीनामा

रितीरिवाजानुसार 8 जुलैला केरिया गावात हा लग्नसोहळा पार पडला. तिघांनीही एकत्र अग्नीभोवती फेरे घेतले. दोन्ही वधूंकडची आणि वराकडील मंडळींसह ग्रामस्थांनीही या लग्नसोहळ्याला उपस्थितील लावली.

घोडाडोंगरी जनपद पंचायतीचे उपाध्यक्ष मिश्रीलाल पराते म्हणाले, "या तिन्ही कुटुंबाला असं लग्न करण्यासाठी काहीच हरकत नव्हती, त्यांनी आक्षेप घेतला नाही. त्यांनी आपासतच असं लग्न करण्याचं ठरवलं"

हे वाचा - चाहत्यांचं प्रेमच ते; सुशांतच्या आठवणीत बांधला त्याच्या नावाचा चौक

दरम्यान कोरोनाव्हायरसच्या परिस्थिती असा लग्नसोहळा आयोजित करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणं गरजेचं आहे. मात्र अशा लग्नासाठी परवानगी घेण्यात आली नाही आणि देण्यातही आलेली नाही. या प्रकरणाचा आता तपास सुरू करण्यात आला आहे, असं घोडाडोंगरीच्या तहसीलदार मोनिका विश्वकर्मा म्हणाल्या.

Published by: Priya Lad
First published: July 10, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या