अजब पंचायतीचा गजब फतवा; गायीच्या मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून अल्पवयीन मुलीचं करणार लग्न

अजब पंचायतीचा गजब फतवा; गायीच्या मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून अल्पवयीन मुलीचं करणार लग्न

मध्यप्रदेशातील एका व्यक्तीकडून चुकून गायीच्या वासराचा मृत्यू झाला. आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून पंचायतीने काढलेला फतवा ऐकून तुमच्या भुवया उंचावतील.

  • Share this:

विदिशा ( मध्य प्रदेश), 17 फेब्रुवारी : आपण 21व्या शतकात वावरत असलो तरी समाजातील अजब समजूती आणि अंधाश्रद्धेला अजूनही अनेक जण बळी पडत आहेत. अजब समजूतींमुळे अनेकदा काहींना नाहक त्रासाला बळी पडावं लागत असतं. असाच एक प्रकार घडलाय मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात.

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एका गावकऱ्याच्या हातून गायीच्या वासऱ्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर गावातील पंचायतीने जो अजब फतवा सुनावला तो ऐकून तुमच्या भुवया उंचावतील. गावच्या पंचायतीने चक्क त्या गावकऱ्याच्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्याचा फतवाच काढला. हा फतवा काढताच लग्नाची तयारीही करण्यात आली. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे लग्न थांबवण्यात आलं आहे.

Delhi Metro मध्ये महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवणार निघाला इंजीनिअर, अशी पटली ओळख

या अजब पंचायतीच्या म्हणण्यानुसार, गायीचा वासराचा मृत्यू होऊन पाप झाल्याने त्या पापापासून वाचवण्यासाठी कन्यादान हा एकमेव मार्ग आहे. गायीचा वासराचा मृत्यू ही दुर्दैवी बाब नक्कीच आहे मात्र त्यासाठी अल्पवयीन मुलीच लग्न करून देण्याचा निर्णय घेणं ही त्याहून अधिक दुर्दैवी बाब आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हा गावकरी बाईकने जात असताना गायीचं वासरू मध्ये आल्याने अपघात घडला. आणि या अपघातात त्या वासराचा मृत्यू झाला. तो गावकरी गंगा नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी आणि संपूर्ण गावाला जेवण देण्यासाठी तयार होता. मात्र पंचायतीने या सगळ्याचा विरोध करून त्याच्या अल्पवयीन मुलीच लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

हेल्मेट असतं तर वाचला असता, नागपुरातील अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO

महिला आणि बाल विभाग आणि पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत गाव गाठलं. त्याचवेळी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला आणि आपली मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळून लावला. पोलिसांनी मुलीचे अधारकार्ड तपासल्यानंतर मुलीचं वय 14 वर्षाहून कमी असल्याचं उघड झालं. मात्र यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

VIDEO ''हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'', ऐकणाऱ्यालाच बसला शॉक

First published: February 17, 2020, 12:56 PM IST

ताज्या बातम्या