ग्वाल्हेर, 15 फेब्रुवारी : भाजप राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) आता शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या 'एक परिचर्चा' या कार्यक्रमात याची घोषणा केली. शिंदे ग्वाल्हेरच्या विकासाच्या कल्पनांवर बोलत होते. राज्ससभा खासदार शिंदे पुढे म्हणाले की, ते आता शहरातील स्वयंसेवकांसह वाहतुकीची जबाबदारी घेणार आहेत. यासाठी ते वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षण घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
आज खासदार ज्योतिरादित्य ग्वाल्हेरमधील अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. परिसंवादानंतर ते जयविलास पॅलेसमध्ये प्रतिनिधीमंडळासोबत चर्चा करतील आणि डॉक्टर्स सेमिनारमध्ये सहभागी होतील. सायंकाळी 5 वाजता जयारोग्य रुग्णालयात ट्रॉमा सेंटरची पाहणी केल्यानंतर ते रात्री 7.45 वाजता ट्रेनने दिल्लीला रवाना होतील. भाजप खासदार शिंदे याआधीत असलेल्या पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, वाकडं झालेलं बोट कधीच सरळ होऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष कधीच सकारात्मक विचार करू शकला नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यांनी आपल्या मार्गाने जावं, आम्ही आपल्या.
हे ही वाचा-मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या त्या VIRAL VIDEO नंतरची मोठी अपडेट
भाजपच्या वर्गाचं कौतुक
शिंदे रविवारी शहरात पोहोचले. येथे त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यामध्ये ते म्हणाले की, भाजपच्या वर्गाचं खूप महत्त्व आहे. वर्गांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होते. ही एक चांगली परंपरा आहे. येथे विचारांचं आदान-प्रदान करणं आणि ज्ञान ग्रहण करणं शिकवतो. ते पुढे म्हणाले की, जर एखादा व्यक्ती स्वत:ला अतिज्ञानी समजत असेल तर त्याच्या यशाला उतरली कळा लागते.
भाजपच्या प्रशिक्षण शिबिरातील अनुभव
खासदार म्हणाले की, वर्गांमध्ये वेळोवेळी ज्ञान प्राप्ती होते. याशिवाय लोकांसोबत समन्वयही होतो. मी वर्गात सहभागी झालो होतो. तिनही वर्गात वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. यातून ऊर्जा मिळते. एकता वाढते आणि समर्पणाची भावना वाढीस लागते. लक्ष्य पूर्ण कसं करायचं, जनसेवा कशी करावी, सकारात्मक विचार कसा निर्माण करायचा या सर्वाचा अनुभव वर्गात मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Jyotiraditya scindia, Madhya pradesh, Modi government, PM narendra modi