मराठी बातम्या /बातम्या /देश /

रिअल हिरो! दिवसभर पोलिसाचं कर्तव्य बजावून त्यानंतर कोरोना रुग्णांवर उपचार करणारा अवलिया डॉक्टर

रिअल हिरो! दिवसभर पोलिसाचं कर्तव्य बजावून त्यानंतर कोरोना रुग्णांवर उपचार करणारा अवलिया डॉक्टर

अगोदर पोलीस अधिकारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडायचे आणि त्यानंतर डॉक्टर बनून संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या घरच्यांवर उपचार करायचे अशी दुहेरी सेवा मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक पोलीस अधिकारी करत आहेत.

  • Published by:  News18 Desk
इंदूर (मध्य प्रदेश), 2 मे :  अगोदर पोलीस अधिकारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडायचे आणि त्यानंतर डॉक्टर बनून संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या घरच्यांवर उपचार करायचे अशी दुहेरी सेवा मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक पोलीस अधिकारी करत आहेत. ते दररोज पहिल्यांदा पोलीस म्हणून जबाबदारी पार पाडतात आणि त्यानंतर डॉक्टर बनून संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या घरच्यांवर उपचार करतात. राजेश सहाय असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून ते इंदूर येथे पोलिसांच्या विशेष विभागाचे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) आहेत. कोरोना काळात मागील वर्षभरात तत्पर राहून सुरक्षा नियम आणि टाळेबंदीचे पालन पोलीस सातत्याने करून घेत आहेत. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थाही सांभाळत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अनेक पोलीस कर्मचारी या विषाणूने संक्रमितही झाले. तर, काही जणांना जीवही गमवावा लागला. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही हाच धोका निर्माण झाला आहे. एमबीबीएस आणि एमडीचीही पदवी पोलीस अधीक्षक राजेश सहाय ड्युटी संपल्यानंतर रुग्णांसाठी डॉक्टर बनून सेवा देतात. पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य निभावताना ते संक्रमित पोलीस कर्मचार्‍यांवर इलाजही करत आहेत. राजेश सहाय हे क्वालिफाईड डॉक्टर असून पोलीस सेवेत येण्याआधी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस आणि एमडीची पदवीही घेतली आहे. इंदूरमध्ये पोलीस विभागाकडून कोविड प्राथमिक उपचार केंद्र चालवले जाते. येथे पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यास भरती केले जाते. आतापर्यंत येथे फक्त एक डॉक्टर ड्युटीवर होते. मात्र, इंदूर शहरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे त्यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला होता. अशा स्थितीत पोलीस अधिकारी सहाय पुढे आले आणि त्यांनीही कोरोना संक्रमित पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार करण्यास सुरुवात केली. आता ते डॉक्टर म्हणून निभावत असलेले कर्तव्य त्यांच्या दिनचर्येचा भाग बनले आहे. दिवसभर पोलीस म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर ते कोरोना बाधितांवर उपचार करतात. हे वाचा - ‘या वयात रोमान्स करताना लाज वाटत नाही का?’ सलमान खाननं दिलं अजब उत्तर 'पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी मी घेतलेले शिक्षण आज लोकांना उपयोगी पडत आहे, हे मी स्वतःचे भाग्य समजतो. एका बाजूला पोलीस वर्दी अंगावर चढवून देशाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. तर, दुसर्‍या बाजूला डॉक्टर बनून जनसेवा करण्याचे सौभाग्यही मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीला घाबरून जाण्याचे कारण नाही. जर, काही लक्षण दिसत असेल तर तत्काळ कोविड-19 टेस्ट करावी आणि उपचार सुरू करावेत, अशी माझी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे. हे वाचा - भलतीच फजिती! डल्ला मारायला आलेल्या चोरांवरच झाला हल्ला; व्हिडिओ VIRAL कोरोनाचे मोठे संकट संपूर्ण जगावर घोंघावत असताना राजेश सहाय यांच्यासारखे अधिकारी पुढाकार घेऊन कोविड -19 रुग्णांवर उपचार करत आहेत, ही बाब नक्कीच कौतुकास पात्र आहे आणि अनेकांना प्रेरणादायीही ठरणार आहे.
First published:

Tags: Coronavirus, Indore, Indore News

पुढील बातम्या