तिसरं बाळ कुणाचं? पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून केली DNA टेस्ट आणि...

तिसरं बाळ कुणाचं? पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून केली DNA टेस्ट आणि...

पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर जेव्हा घटस्फोटासाठी पतीनं दिलेलं कारण वाचलं तेव्हा न्यायाधीशांना धक्काच बसला.

  • Share this:

भोपाळ, 14 ऑक्टोबर : आपल्या जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय घेण्याची हद्द केल्याचं प्रकरण मध्य प्रदेशात समोर आलं आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता यासाठी पत्नीला कॅरेक्टर टेस्ट करायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्वाल्हेरमध्ये पत्नीला न्यायालयाच्या आदेशानुसार डीएनए टेस्ट करावी लागली.

ग्वाल्हेरमधील कौटुंबिक न्यायालयात एका पतीने पत्नीवर संशय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. पतीनं घटस्फोटासाठी केलेल्या अर्जाचं कारण समजताच न्यायाधीशांनाही धक्का बसला. पतीनं घटस्फोट घेण्यामागे तिसऱ्या मुलाचा जन्म हे कारण सांगितलं होतं. पतीने म्हटलं होतं की, पत्नी जवळपास एक वर्षापासून दूसऱ्या शहरात राहत आहे. अशा परिस्थितीत मुलाचा जन्म कसा शक्य आहे. तिसरं मुल आपलं नसल्याचा आरोपही पतीने केला होता.

दरम्यान, न्यायालयात पत्नीला बोलावण्यात आलं तेव्हा तिने पतीने केलेले आरोप फेटाळून लावले. पत्नी म्हणाली की, पती खोटं बोलत असून हे मुल तिच्या पतीचेच आहे. न्यायालयानं दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर दोघांमधील हा वाद सोडवण्यासाठी आणि पतीचा संशय दूर करण्यासाठी न्यायालयाने एक निर्णय घेतला. तिसऱ्या मुलाची आणि पतीची डीएनए टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. डीएनए टेस्टचे रिपोर्ट येताच त्यामध्ये पतीने लावलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं.

डीएनए टेस्टनुसार महिलेचं तिसरं अपत्य तिच्या पतीपासून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, पीडीत महिलेच्या वकीलांनी म्हटलं की, पतीने डीएनए टेस्ट करून घेतली. त्यात सर्व काही समोर आलं आहे. तरीही तिला तिचा हक्क मिळालेला नसल्याचं म्हटलं आहे. डीएनए टेस्ट पास केल्यानंतरही पती तिला सोबत ठेवण्यास तयार नाही.सध्या दोघांमधील वाद मिटावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: court
First Published: Oct 14, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading