मध्य प्रदेशात सर्वात मोठं सत्तानाट्य, 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचं कमलनाथ यांच्यासमोर आव्हान

मध्य प्रदेशात सर्वात मोठं सत्तानाट्य, 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचं कमलनाथ यांच्यासमोर आव्हान

मुख्यमंत्री कमलनाथ बहुमत सिद्ध करण्यास यशस्वी होणार की सरकार कोसळणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • Share this:

भोपाळ, 20 मार्च : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या सत्तानाट्याचा आज अखेरचा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला आज (शुक्रवारी) संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ बहुमत सिद्ध करण्यास यशस्वी होणार की सरकार कोसळणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च (Supreme court) न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ (Kamalnath) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेशातील राजकीय घमासान

भाजपने दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने आज फ्लोअर टेस्ट (Floor Test) होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, विधानसभाध्यक्षांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चला विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यत स्थगित केल्याची घोषणा केली. असं असताना विधानसभेत फ्लोअर टेस्‍टची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते आणि तातडीने फ्लोअर टेस्टची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता कमलनाथ सरकार बहुमत सिद्ध करू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First Published: Mar 20, 2020 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading